Jharkhand: 75 टक्के मुस्लीम असल्यानं बंद झाली शाळेतील प्रार्थना; हात जोडण्यासही मनाई

देशातील नागरिकांचा धार्मिक वाद आता विद्या मंदिरापर्यंत पोहचला आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील सदर ब्लॉक अंतर्गत कोरवाडीह येथील अपग्रेडेड विद्यालयात धर्माच्या नावावर नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भागातील बहुसंख्य मुस्लीम लोकसंख्या असलेल्या लोकांनी  मनमानी पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला आहे.

Muslims shut down the school prayer tradition
मुस्लिमांनी दबाव टाकून बंद पाडली शाळेतील प्रार्थनेची परंपरा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानेच त्यांनी शाळेतील प्रार्थना बदलल्यासाठी दबाव टाकला
  • स्थानिक पातळीवर अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या ७५ टक्के आहे.

गढ़वा: देशातील नागरिकांचा धार्मिक वाद आता विद्या मंदिरापर्यंत पोहचला आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील सदर ब्लॉक अंतर्गत कोरवाडीह येथील अपग्रेडेड विद्यालयात धर्माच्या नावावर नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भागातील बहुसंख्य मुस्लीम लोकसंख्या असलेल्या लोकांनी  मनमानी पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला आहे. येथील मुस्लिम समाजातील लोकांवर आरोप केला जात आहे की, इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानेच त्यांनी शाळेतील प्रार्थना बदलल्यासाठी दबाव टाकला आहे. दरम्यान, इतके तुष्टीकरण चांगले नाही, असे भाजप आमदार भानू प्रताप शाही यांनी म्हटले आहे.
प्रार्थना बदलण्याबरोबरच हात जोडण्याची परंपराही बदलण्यात आली.

शाळेत अनेक वर्षांपासून मुले वर्ग सुरू होण्यापूर्वी एकच प्रार्थना करत होती. परिसरातील मुस्लीम समाजातील लोकांनी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक युगेश राम यांच्यावर दबाव आणून प्रार्थना बदलण्यास सांगितल्याचा आरोप आहे. मुस्लीम समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, स्थानिक पातळीवर अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या ७५ टक्के आहे, त्यामुळे त्यांच्या अनुषंगानेही नियमावली बनवायला हवी. मुस्लिम समाजातील लोकांच्या दबावामुळे शाळेमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रार्थना मुख्याध्यापकांना बंद करावी लागली. आता इथे 'तू कर दान विद्या का...' ही प्रार्थना सुरू करावी लागेल आणि 'तूच राम, तूच रहीम...' ही प्रार्थना बंद करावी लागेल. एवढेच नाही तर मुलांना प्रार्थनेदरम्यान हात जोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.

75 टक्के मुस्लिम लोकसंख्येचा दबाव

यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना कळवूनही मुख्याध्यापकांनी ही माहिती दिली आहे. प्रदीर्घ काळापासून मुस्लिम समाजातील लोक 75 टक्के लोकसंख्येचा हवाला देत त्यांच्या सूचनेनुसार नियमांचे पालन करण्यासाठी दबाव आणत असल्याचे सांगितले जात आहे.

Read Also : "आधीचे अडीच वर्ष आले नाहीत अन् आताही लंगड्या घोड्यावर बसले"

शासन आदेशाची पायमल्ली होऊ दिली जाणार नाही- जिल्हा शिक्षणाधिकारी

गढवाचे प्रभारी जिल्हा शिक्षण अधिकारी कुमार मयंक भूषण यांनी मान्य केले आहे की, शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मर्जीनुसार शाळेत प्रार्थना सभा घेण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची चौकशी केली जाईल. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन कोणालाही करू दिले जाणार नाही.

सरपंचांनी दिला वाद मिटवण्याचा विश्वास 

कोरवाडीह येथील पंचायतीचे प्रमुख शरीफ अन्सारी यांनी सांगितले की त्यांनाही शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अशा वादाची माहिती मिळाली आहे. ते शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असून कोणत्याही परिस्थितीत गंगा-जमुनी तहजीब कायम ठेवली जाईल.

Read Also : घरात सिनेमांचं वातावरण असूनही अपयशी ठरला सुजैनचा भाऊ

भाजप आमदाराने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर उपस्थित केला प्रश्न 

शाळेतील प्रार्थना वादाचे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये येताच भाजपचे भवनाथपूरचे आमदार भानू प्रताप शाही यांनी या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. भानू प्रताप शाही म्हणाले की, हे प्रकरण गढवा येथील आहे, जिथे राज्याचे पेयजल स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर निवडून आले आहेत. त्यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे.  मुख्यमंत्री हेमंत सोरेन झारखंडला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत? त्यामुळे इतके तुष्टीकरण चांगले नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री सोरेन यांना विचारला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी