शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना प्रिन्सिपल कॅमेऱ्यात कैद

पंजाबच्या सरकारी शाळेतील एक प्रिन्सिपल महिला शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना रंगेहाथ सापडला आहे. प्रिन्सिपलचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

minor_rape_news
शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना प्रिन्सिपल कॅमेऱ्यात कैद  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • दोन महिला टिचरसह अश्लील चाळे करताना पकडला गेला प्रिन्सिपल
  • शाळेतील स्टाफने प्रिन्सिपलच्या रुममध्ये लावले होते कॅमेरे
  • प्रिन्सिपलविरोधात शिक्षण विभागात करण्यात आली होती तक्रार

चंदीगड: शाळा हे विद्येचं मंदिर म्हटलं जातं. त्यामुळे या पवित्र ठिकाणी शिक्षक आणि शिक्षिकेला देवी-देवतेसमान मानलं जातं. कारण याच शिक्षकांवर विद्यार्थ्याचं भविष्य घडविण्याचं अत्यंत मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली असते. त्यामुळे शिक्षकांकडून अशी अपेक्षा असते की, ते विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊन देशाचं भविष्य मजबूत करतील. पण एक अशी घटना आता समोर आली आहे की, ज्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबमधील एका सरकारी शाळेत एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे प्रिन्सिपल हे आपल्या कार्यालयात दोन महिला शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करताना आढळला आहे. सोशल मीडियावर याप्रकरणी दोन वेगवेगळ्या क्लीप व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये प्रिन्सिपल हा वेगवेगळ्या शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचं दिसत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या दिसतं आहे की, एक महिला शिक्षिका ही प्रिन्सिपलच्या कार्यालयात जाताच प्रिन्सिपल तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात करतो. या व्हिडिओमध्ये असंही दिसतं की, शिक्षिका ही प्रिन्सिपलच्या पाया देखील पडते. अशाच प्रकारे प्रिन्सिपल दुसऱ्याही शिक्षिकेसोबत वागत असल्याचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. 

प्रिन्सिपलच्या अशा वागण्याबाबत संपूर्ण शाळेला माहितं होतं. याविषयी अनेका तक्रार देखील करण्यात आली होती. तसं या प्रकरणी गावातील पंचायतमध्ये सरपंचांसमोर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे सरपंचांनी शिक्षण विभागात आरोपी प्रिन्सिपल विरुद्ध तक्रार देखील केली. तसंच त्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशीही मागणीही त्यांनी केली होती. पण कोणताही पुरावा नसल्याने शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नव्हती. 

जेव्हा आरोपी प्रिन्सिपलविरोधात काहीही कारवाई झाली नाही तेव्हा शाळेतील कर्मचाऱ्यांनी वैतागून पुरावा मिळविण्यासाठी थेट प्रिन्सिपल कार्यालयातच छुपे कॅमेरे बसवले. त्यानंतर प्रिन्सिपलंची सगळी कृत्य ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे शाळेतील कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...