Delhi student thrown from roof top: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षिकेने एका पचवीच्या विद्यार्थीनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहे. या विद्यार्थीनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे. (School student thrown from 1st floor of a school rooftop in shocking incident take place in delhi)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका शाळकरी विद्यार्थीनीला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन शिक्षिकेने फेकल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या घटनेचं वृत्त वाऱ्यासारख्या सर्वत्र पसरलं आणि त्यानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी जमावाला दूर करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
DELHI: TEACHER THROWS STUDENT FROM ROOF — Mirror Now (@MirrorNow) December 16, 2022
A student was thrown off from the 1st floor of the school by her #teacher. The injured girl child has been hospitalised and the accused teacher has been detained. | #Delhi@nukul_jashoria reports pic.twitter.com/ElmXgjJUpw
हे पण वाचा : गरोदरपणात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी महिला शिक्षिकेने आधी 5वीच्या विद्यार्थीनीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रागाच्या भरात त्या विद्यार्थीनीला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं. जखमी विद्यार्थीनीवर बाडा हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला शिक्षिकेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आपला अधिक तपास सुरू आहे.
हे पण वाचा : कोणतीही व्यक्ती अविवाहित का असते? जाणून घ्या कोणती रास काय सांगते
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित शिक्षकाबाबत यापूर्वी काही महिलांनी तक्रार सुद्धा केली होती. मात्र, पालकांच्या या तक्रारीकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. शाळेतील शिक्षिकेकडून झालेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.