शाळेच्या आवारात SEX करणाऱ्या शिक्षकाला रंगेहात पकडलं, ग्रामस्थांनी केली धुलाई

शाळेतील शिक्षकाला शाळेच्या आवारातच सेक्स करताना रंगेहात पकडलं आहे. तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाची चांगलीच धुलाई केली आहे.

Teacher caught having sex in school premises
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला चोपलं
  • आरोपी शिक्षक आणि आंगणवाडी सेविका यांच्यात होते अनैतिक संबंध
  • तमिळनाडूमधील एस. उदुप्पम गावात घडली धक्कादायक घटना

चेन्नई: शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवतात, त्यांना चांगल्या सवयी लावतात आणि शिक्षणाची गोडी लावतात. मात्र, तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. नमक्कल जिल्ह्यातील एस. उदुप्पम गावात असलेल्या एका शाळेतील शिक्षकाला शाळेच्या आवारात सेक्स करताना रंगेहात पकडलं आहे. आरोपी शिक्षक हा आंगणवाडी सेविकेसोबत शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवत होता. 

ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं

मिळालेल्या माहितीनुसार, एस. उदुप्पम गावात असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षक व्ही. सर्वानन याला आंगणवाडी सेविकेसोबत सेक्स करताना पकडण्यात आलं आहे. ३८ वर्षीय व्ही. सर्वानन हा सरकारी शाळेत शिक्षक आहे आणि त्याचे आंगणवाडी सेविकेसोबत अनैतिक संबंध होते. सर्वानन आणि आंगवाडी सेविका हे शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात धडक देत दोघांना रंगेहात पकडलं.

ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाची केली धुलाई

आरोपी शिक्षक आणि आंगणवाडी सेविकेला शाळेच्या आवारात सेक्स करताना रंगेहात पकडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाची चांगलीच धुलाई केली. या घटनेची माहिती मिळताच पुदानसंदाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. 

मुख्याध्यापकांनी यापूर्वीच दिली होती वॉर्निंग

आरोपी शिक्षक व्ही सर्वानन आणि आंगणवाडी सेविका हे शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आवारात सेक्स करत असत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या आरोपी शिक्षकाला आणि आंगणवाडी सेविकेला यापूर्वीच वॉर्निंग दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी शिक्षक व्ही. सर्वानन याला शाळेकडून कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आंगणवाडी सेविकेवर सुद्धा कारवाई करण्याचं मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे. शाळेचे मुख्याध्यापक के. जयराय यांनी म्हटलं, "व्ही. सर्वानन या शिक्षका विरुद्ध आम्ही योग्य ती कारवाई करु".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...