Omicron - ओमायक्रॉन व्हेरिएंटचं या महामारीचा खात्मा करणार, इतक्या दिवसांत जग पूर्वपदावर येणार, शास्त्रज्ञांना दावा

जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या बदललेल्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला असून हा आजार अतिशय झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत वेगाने वाढायला लागली आहे.

थोडं पण कामाचं
  • जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या बदललेल्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला असून हा आजार अतिशय झपाट्याने पसरत आहे.
  • त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत वेगाने वाढायला लागली आहे.
  • हाच ओमायक्रॉन विषाणू महामारीचा अंत करेल असं भाकीत वर्तवलं

डेन्मार्क : जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या बदललेल्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला असून हा आजार अतिशय झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत वेगाने वाढायला लागली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार असल्याची भीती वर्तवण्यात येत असून त्याचा मुकाबला करण्यासाठी शक्य ते सगळे उपाय केले जात आहेत.

जगात चिंतेचे परिस्थिती असताना डेन्मार्कच्या तज्ज्ञ टायरा ग्रोव्ह क्राऊस (Tyra Grove Krause) यांनी हाच ओमायक्रॉन विषाणू महामारीचा अंत करेल असं भाकीत वर्तवलं आहे. क्राऊस या डेन्मार्कच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुख साथरोगतज्ज्ञ आहेत. जानेवारीच्या शेवटापर्यंत बहुसंख्य देशात ओमायक्रॉनग्रस्तांचा आकडा भयंकर वाढेल आणि  हर्ड इम्युनिटीमुळे नंतर हळूहळू हा आकडा खाली येऊ लागेल असे मत त्यांनी मांडले आहे. 

ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असला तरी त्यामुळे बाधित लोकांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. ही चांगली गोष्ट आहे. यामुळे लोकांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी)  निर्माण होत असल्याचे क्राऊस यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. परंतु याची लक्षणे सौम्य स्वरुपाची असल्याचे दिसले आहे. ओमयाक्रॉनमुळे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आशा असल्याचे क्राऊस यांनी म्हटले.

जानेवारीत सुसाट

ओमायक्रॉन व्हेरिएंट जानेवारीच्या शेवटच्या आठड्यामध्ये आपल्या शिखरावर असेल. या काळात रुग्णसंख्या प्रचंड वाढले. परंतु फेब्रुवारीमध्ये ओमायक्रॉन संसर्गाचा वेग कमी होईल आणि आरोग्य सेवांवरील दबावही कमी होताना दिसेल. त्यानंतर जनजीवनही सामान्य होईल, असे क्राऊस यांनी म्हटले. मात्र जानेवारीमध्ये आपल्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. त्यांचा इशारा रुग्णवाढ आणि आरोग्य सेवांकडे असल्याचे दिसते.

कोरोना जाणार नाही...

आणखी एक तज्ज्ञ लार्स ओस्टरगार्ड (Professor Lars ostergaard) यांनीही क्राऊस यांच्यासारखेच मत व्यक्त केले आहे. कोविड-19 पासून आपण कायमचे मुक्त होणार नाही, परंतु कालांतराने हा विषाणू आटोक्यात येईल. नवीन लसींमुळे आणि ज्या लोकांना आधी संसर्ग झाला त्यांच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल, असेही ते म्हणाले.

भारतात रुग्णवाढ

दरम्यान, भारतातही कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. काही दिवसांपूर्वी 10 हजारांच्या आत आलेला आकडा पुन्हा 50 हजारांकडे वाटचाल करत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 37 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत, तसेच ओमायक्रॉन रुग्णांचा आकडाही 2000 जवळ पोहोचला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी