Scientists Warn That Humans Will Run Out Of Food In 27 Years : आणखी फक्त २७ वर्ष आणि २५१ दिवस शिल्लक आहेत. माणूस लवकर जागा झाला आणि त्याने शेतीला प्राधान्य दिले तर ठीक नाही तर २०५० पासून पृथ्वीवर अन्नधान्याचे मोठे संकट निर्माण होईल. कोट्यवधी नागरिकांचा भूकबळी जाईल. हळू हळू भूकेमुळे पृथ्वीवरच्या सर्व माणसांचा मृत्यू होईल. सोशियो बायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन यांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे.
माणसांच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पृथ्वीसारख्या दोन ग्रहांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात आपण एकाच ग्रहावर राहून सर्व गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. माणसाचे पोट भरण्याची पृथ्वीची क्षमता मर्यादीत आहे आणि पृथ्वीवरची लोकसंख्या वेगाने वाढत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार पृथ्वीवरची माणसांची लोकसंख्या ७९४ कोटींपेक्षा जास्त आहे. यातही चीनची लोकसंख्या १४३ कोटींपेक्षा जास्त आणि भारताची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे या दोन देशांसमोर तर अन्नधान्य हा सर्वात मोठा विषय आहे. धान्य, डाळी, फळे, तेबलिया यांच्या शेतीचे व्यवस्थित नियोजन केले आणि कमी जागेत जास्त उत्पन्नावर भर दिला तरच शेती माणसाची भूक शमविण्यासाठी पुरेसे अन्न पुरवू शकेल.
अमेरिकेसारख्या संपन्न देशात माणसं ज्या पद्धतीने दररोज खातात तशा सवयी इतर देशांनातील नागरिकांनाही लागल्या आहेत. या सवयींचे प्रमाण वाढले तर अन्नधान्य संकट आणखी लवकर येण्याचा धोका आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्य आणि पाणी साठा विषम स्थितीत आहे. पुढील काही वर्षांत मागणी आणि पुरवठ्यासाठी उपलब्ध साठा यांच्यातील तफावत वाढण्याचा धोका आहे. ही तफावत वाढली तर फक्त अन्न आणि पाणी या दोन गोष्टींसाठी जगात युद्धांचा भडका उडण्याचा धोका आहे. महायुद्ध फक्त अन्न आणि पाणी यांच्यासाठी होण्याचा धोका आहे.