मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आजपासून लसीची दुसरा डोस देण्यास सुरुवात

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 26, 2020 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची लस तयार करण्याचे कार्यही तितक्याच वेगाने चालू आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्था या लसीच्या मानवी चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर काम करत आहेत.

Corona vaccine
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आजपासून लसीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • नायर रुग्णालयात कोव्हिशील्डची लस दिली जाणार
  • अॅस्ट्राझेनेका लस चाचणीतील एका स्वयंसेवकाचा मृत्यू
  • सीरम संस्था सांभाळत आहे उत्पादनाची जबाबदारी

मुंबई: कोरोनाबाधितांची (Corona cases) संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची लस (corona vaccine) तयार करण्याचे कार्यही तितक्याच वेगाने चालू आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्था (various organizations) या लसीच्या मानवी चाचणीच्या (human testing) वेगवेगळ्या टप्प्यावर काम करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) लसीकडे सर्वांचेच डोळे लागलेले असताना सीरम संस्थेकडून (Serum Institute) या लसीची दुसरी मात्रा (second dose) देण्याची प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये (BMC hospitals) चालू होणार आहे. केईएम रुग्णालयातील ज्या स्वयंसेवकांना (vaccine volunteers) पहिली मात्रा देऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. केईएममध्ये आत्तापर्यंत साधारण १०० स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.

नायर रुग्णालयात कोव्हिशील्डची लस दिली जाणार

केईएम रुग्णालयासोबतच मुंबई सेंट्रलनजिकच्या नायर रुग्णालयातही कोव्हिशील्ड लस दिली जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान कोरोनाच्या लसी देऊन त्याच्या परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. कोव्हिशील्डची दुसरी मात्रा दिल्यानंतर स्वयंसेवकांवर त्याच्या होणाऱ्या परिणामांचे अध्ययन केले जाणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अॅस्ट्राझेनेका लस चाचणीतील एका स्वयंसेवकाचा मृत्यू

केईएम रुग्णालयात २६ सप्टेंबरपासून ही लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २० ते ४५ या वयोगटातील ३ लोकांना या लसीची दुसरी मात्रा देण्यात आली होती. यापाठोपाठ २८ सप्टेंबरपासून नायर रुग्णालयातही कोव्हिशील्ड लसीची मानवी चाचणीही चालू झाली आहे. भारतासोबतच ब्राझीलमध्येही या लसीची मानवी चाचणी चालू आहे. काही दिवसांपूर्वी तिथे ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता. पण या चाचण्या चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सीरम संस्था सांभाळत आहे उत्पादनाची जबाबदारी

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ही ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या उत्पादनाची जबाबदारी सांभाळत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भारतासारख्या देशांना लस पोहोचवण्याचे कार्य बिल गेट्स फाऊंडेशन आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था करत आहेत.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी