अशोक स्तंभावरील आक्रमक सिंह पाहून राजकीय नेत्यांची लागली लढाई; विरोधकांकडून टीका

नवीन संसद भवनाच्या इमारतीवरील राष्ट्रीय चिन्हावरून वाद निर्माण झाला आहे. आक्रमक सिंह पाहून राजकीय नेत्यांमध्ये लढाई लागली आहे. ट्विट करत ट्विटर वॉर सुरू केलं आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते राष्ट्रचिन्हापेक्षा ते वेगळे असल्याचं सांगत आहेत.

Seeing the aggressive lion on the Ashoka pillar, the political leaders became aggressive
अशोक स्तंभावरील आक्रमक सिंह पाहून राजकीय नेते झाले आक्रमक  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : नवीन संसद भवनाच्या इमारतीवरील राष्ट्रीय चिन्हावरून वाद निर्माण झाला आहे. आक्रमक सिंह पाहून राजकीय नेत्यांमध्ये लढाई लागली आहे. ट्विट करत ट्विटर वॉर सुरू केलं आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते राष्ट्रचिन्हापेक्षा ते वेगळे असल्याचं सांगत आहेत. हे सिंह सारनाथ आणि सांचीच्या सिंहांपेक्षा वेगळे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय या दोन्ही ठिकाणी सिंह अतिशय शांत मुद्रेत दिसत आहेत. तर, सेंट्रल व्हिस्टाच्या छतावर बसलेल्या सिंह आक्रमक दिसत आहेत.

दरम्यान, हा वाद तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाचा वाद पेटला आहे. महुआ मोईत्रा यांनी एका ट्विटद्वारे या नव्या प्रतिकृतीची खिल्ली उडवली आहे.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे माजी एडीजी बीआर मणी म्हणाले की मूळ स्तंभ 7-8 फूट आहे तर संसद भवनावरील राष्ट्रीय चिन्ह जवळ-जवळ तीन पट उंच आहे. ते म्हणाले की, संसद भवनावर 1905 च्या अशोक स्तंभाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या दाव्याला मी बिनबुडाचे किंवा निरर्थक म्हणणार नाही, पण त्यावर राजकीय भाष्य करणे योग्य नाही."

सम्राट अशोकाने अशोक स्तंभ बांधला. ते देशात अनेक ठिकाणी बांधले गेले. अशोक स्तंभ हे स्वतंत्र भारताचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले. वाराणसीतील सारनाथ संग्रहालयात ठेवलेला अशोक स्तंभ 26 ऑगस्ट 1950 रोजी देशाचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आला. हे चिन्ह सरकारी लेटरहेडचा भाग आहे. ते देशाच्या चलनांवर प्रतिबिंबित होते. भारतीय पासपोर्ट देखील अशोक स्तंभाने ओळखला जातो. या स्तंभाच्या तळाशी असलेले अशोक चक्र भारतीय ध्वजाच्या मध्यभागी ठेवलेले आहे. हे चिन्ह सम्राट अशोकाच्या देशातील युद्ध आणि शांतता धोरणाचे प्रतिबिंब आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी