Brutal beating to maid: मोलकरणी मारहाण केल्याप्रकरणी सीमा पात्रांना अटक; मोलकरणीचा 8 वर्षे छळ करणारी क्रूर पात्रा आहे तरी कोण

झारखंडचे (Jharkhand) निवृत्त आयएएस (IAS) अधिकारीची पत्नी आणि भाजपच्या  निलंबित नेत्या सीमा पात्रा (Seema Patra) यांना मोलकरणीला अमानुष मारहाण (beating) केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी त्या अटकेच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांना आज न्यायालयात ( court) हजर केले जाणार आहे.

 Brutal beating to maid: Border guards arrested for beating maid
Brutal beating to maid: मोलकरणी मारहाण केल्याप्रकरणी सीमा पात्रांना अटक  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सीमा पात्रा यांच्या पतीचे नाव महेश्वर पात्रा आहे
  • सीमा पात्रा या भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.
  • मोलकरणीला आठ वर्ष एका खोलीत कोंडून ठेवलं होतं.

रांची : झारखंडचे (Jharkhand) निवृत्त आयएएस (IAS) अधिकारीची पत्नी आणि भाजपच्या  निलंबित नेत्या सीमा पात्रा (Seema Patra) यांना मोलकरणीला अमानुष मारहाण (beating) केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी त्या अटकेच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांना आज न्यायालयात ( court) हजर केले जाणार आहे. (seema patra arrested in maid assaulting case; Who is the cruel patra who tortured the maid for 8 years)

सीमा पात्रा यांच्या पतीचे नाव महेश्वर पात्रा आहे. सीमा पात्रा या भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. मोलकरणीला क्रूरपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. 

मोलकरणीला मारहाण

पीडित मोलकरणीचे नाव सुनीता गुमला असून ती 29 वर्षाची आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी, तिला सेवानिवृत्त IAS महेश्वर पात्रा आणि सीमा पात्रा यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करण्यासाठी आणण्यात आले. त्यानंतर सुनीताला तिची मुलगी वत्सला पात्रासोबत दिल्लीला पाठवण्यात आले. दिल्लीहून वत्सला पात्राची बदली झाल्यानंतर सुनीता पुन्हा रांची सीमा पत्राच्या घरी आली. येथे काम करताना तिचा नेहमीच छळ होत असे. तिने घरी जाण्याची परवानगी मागितली असता सीमा पात्रा हिने  अपंग सुनीताला तब्बल आठ वर्ष एका खोलीत या डाबून ठेवलं. सुनीताला जेवण दिलं जात नव्हतं. मारहाण केली जात होती. गरम तव्याने मोलकरणीला चटके दिले जात होते. 

Read Also : स्विमिंग पूलमध्ये पोहताना 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

इतकेच नाहीतर स्वत च्या मुलाला सीमा पात्राने एका वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. सीमा पात्रा हिला एक मुलगाही आहे, त्याचे नाव आयुष्मान पात्रा असून त्याने मोलकरणीला होत असलेल्या मारहाणीला विरोध केला होता. तेव्हा सीमा पात्राने मुलाला बेड्या टाकून त्याला जबरदस्तीने एक वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. 

कैदेतून सुटका करून सुनीताचा रांचीमधील RIMS मध्ये उपचार 

झारखंडच्या कार्मिक विभागाच्या अधिकाऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी 22 ऑगस्टलाच एका खोलीत कोंडून ठेवलेल्या सुनीताची सुटका केली होती. सुनीतावर सध्या रांचीच्या रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर डझनभर जखमा आहेत. सुनीताला गरम तव्याने चटके देण्यात आले आहेत. लोखंडी रॉडने सुनीताचे चार दात तोडण्यात आले आहेत. तिला अन्न-पाणीही देण्यात येत नव्हते. सुनीताची स्थिती नाजूक आहे, तिला साधं उभे राहता येत नाहीये. बोलता येत नाहीये. 

Read Also : PM Kisan Yojanaच्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे महत्त्वाचा

बंदिवासातून अशी केली मुलीने सुटका

एका दिवशी सुनीताने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती विवेक आनंद बस्के या सरकारी कर्मचाऱ्याला मोबाईलवर मेसेज करून कळवली. माहितीवरून आरगोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर रांची पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने सुनीताची सुटका केली.

सुटकेनंतर सुनीताने सांगितली आप बीती

पात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी क्षेत्र अशोक नगरमध्ये राहते. पीडित सुनीताने सांगितले की, ती गुमला येथील रहिवासी आहे. सीमा पात्रा यांना दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर ती 10 वर्षांपूर्वी घरच्या कामासाठी दिल्लीला गेली. त्यानंतर वत्सलाची बदली झाली तेव्हा म्हणजेच 6 वर्षांपूर्वी सुनीता रांचीला परत आली.  सुनीताचा सुरुवातीपासूनच छळ होत होता. तिला नोकरी सोडायची होती, पण तिला 8 वर्षे घरात डांबून ठेवण्यात आले. तिने घरी जाण्याचे नाव काढले की तिला बेदम मारहाण करण्यात येई. ती आजारी असताना तिच्यावर नीट उपचारही झाले नाहीत.

Read Also : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची कधी होणार प्राणप्रतिष्ठा

राज्यपाल बैस संतापले

सीमा पात्रा प्रकरणाची दखल घेत राज्यपाल रमेश बैस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पोलिसांनी अद्याप दोषीवर कारवाई का केली नाही, असा सवाल केला आहे.

कोण आहे क्रूर पात्रा 

सीमा यांचे पती महेश्वर पात्रा हे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव आणि विकास आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. सीमा याही भाजपच्या नेत्या होत्या. त्यांना पक्षाने बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेचे राज्य निमंत्रकही बनवले होते. पात्रा या भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. 

एससी-एसटी कलमांतर्गत गुन्हा दाखल

सीमा पात्रा यांच्या विरोधात रांचीमधील अरगोरा पोलीस ठाण्यात एससी-एसटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयपीसी कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हटियाचे डीएसपी राजा मित्रा यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस पीडितेची वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून बयान नोंदवता येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी