Shweta Singh Gaur : रशियन, आफ्रिकन मुली असेल तर पाठवा; भाजप महिला नेत्याच्या पतीचा कॉल रेकॉर्ड व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये एका भाजप महिला नेत्याचा मृतदेह आढळला आहे. श्वेता सिंह गौर असे या महिलेचे नाव आहे. श्वेता सिंहचा पती दीपक सिंह गौरने तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. दीपक गौर सिंह याचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते. तसेच याचे पुरावे गोळा करण्यासाठी मृत्यूपूर्वी श्वेता सिंह यांनी आपल्या पतीचे फोन कॉलही रेकॉर्डिंग केले होते. या ऑडियो क्लिप व्हायरल झाला असून आरोपी दीपक सिंह एका दलालाकडे रशियन आणि आफ्रिकन मुलींची मागणी करत आहे.

shweta singh gaur deepak singh gaura
श्वेता सिंह गौर आणि दीपक सिंह गौर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये एका भाजप महिला नेत्याचा मृतदेह आढळला आहे. श्वेता सिंह गौर असे या महिलेचे नाव आहे.
  • श्वेता सिंहचा पती दीपक सिंह गौरने तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
  • दीपक सिंह एका दलालाकडे रशियन आणि आफ्रिकन मुलींची मागणी करत असल्याच्या ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे.

Shweta Singh Gaur : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एका भाजप महिला नेत्याचा मृतदेह आढळला आहे. श्वेता सिंह गौर असे या महिलेचे नाव आहे. श्वेता सिंहचा पती दीपक सिंह गौरने तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. दीपक गौर सिंह याचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते. तसेच याचे पुरावे गोळा करण्यासाठी मृत्यूपूर्वी श्वेता सिंह यांनी आपल्या पतीचे फोन कॉलही रेकॉर्डिंग केले होते. या ऑडियो क्लिप व्हायरल झाला असून आरोपी दीपक सिंह एका दलालाकडे रशियन आणि आफ्रिकन मुलींची मागणी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक सिंहला अटक केली आहे. 

श्वेता सिंह गौर या उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्या होत्या. त्यांचे पती दीपक सिंह हा दारूच्या नशेत आकंठ बुडाला होता. दीपक सिंहचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते. यावरून दीपक सिंह आणि श्वेता सिंह यांच्यात खटकेही उडत होते. दोघांमध्ये सातत्याने वाद होते होते. आपल्या पतीचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याची माहिती श्वेता सिंह यांना होती. यासाठी त्यांनी दीपक सिंहचे फोन कॉलही रेकॉर्ड केले होते. 


ऑडिओ क्लिप व्हायरल


एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये दीपक सिंह एका दलालाशी बोलत आहे. दीपक सिंह या दलाला म्हणतोय की मी बांद्याहून आलोय. सुनील सिंह गौतमने मला तुमचा नंबर दिला आहे. मुलींची काही तरी व्यवस्था करा असे दीपक सिंहा या दलालाला सांगत आहे. तसेच मी सध्या एका हॉटेलमध्ये थांबलोय मुली इथे पाठवता की मला तुमच्याकडे यावे लागेल अशी विचारणाही दीपक सिंहने या दलालाला केली आहे. तसेच तुमच्याकडे रशियन किंवा आफ्रिकन मुली आहेत का? असतील तर पाठवा असेही दीपक सिंह या दलालाला म्हणत होता. आणखी एका ऑडियो क्लिपमध्ये दलाल दीपक सिंहला सांगतो की रशियन मुलगी तर नाहिये पण मोरोक्क्कन मुलगी आहे. इतकेच नाही तर दीपक सिंह म्हणाला की मी सध्या काही मित्रांसोबत आहे आणि आम्हाला एक भारतीय मुलगीही हवी अशी मागणीही दीपकने या दलालाकडे केली. भरपूर वेळ दोघे पैशांबाबत चर्चा करत होते. या चर्चेदरम्यान दीपक सिंहने आपण लखनौच्या हिंदोला नाका येथील एमजे इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थांबल्याचे सांगितले. तसेच दोन्ही मुलींना तिकडेच पाठवा असेही दीपकने या दलालाला सांगितले. 

एका ऑडियो क्लिपमध्ये दीपक सिंह दलालाला रोख रक्कम देण्यास तयार आहे परंतु दलालाने ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. दीपकने दलालाला दोन मुली पाठवण्यास सांगितले त्यासाठी दीपक २० हजार रुपये द्यायला तयार होता. नंतर एक रशियन मुलगी आणि एक मोरोक्कन मुली पाठवण्याचा निर्णय झाला तसेच यासाठी दीपकने २३ हजार रुपये या दलालाला दिले. 


पोलीस चौकशी

या प्रकरणी पोलिसांनी दीपक सिंह गौरला शुक्रवारी अटक केली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दीपक सिंह फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अनेक ऑडियो आणि व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणासंबंधित सर्व बाजूंची चौकशी आणि तपास केला जाईल. तसेच आरोपींना कडक शिक्षा होईल असेही पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी