Attorney General : ज्येष्ठ वकील आर व्यंकटरामानी देशाचे नवे अ‍ॅटर्नी जनरल, ३ वर्षांचा असेल कार्यकाळ

Attorney General of India: ज्येष्ठ अधिवक्ता व्यंकटरामानी यांनी 2010 मध्ये भारतीय कायदा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून ते तामिळनाडू राज्यासाठी विशेष वरिष्ठ वकील म्हणून काम करत आहेत आणि आंध्र प्रदेश राज्याचे ते विशेष वरिष्ठ सल्लागार आहेत.

R Venkataramani new Attorney General
्येष्ठ वकील आर व्यंकटरामानी देशाचे नवे अ‍ॅटर्नी जनरल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 30 सप्टेंबरला केके वेणुगोपाल यांचा अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ संपत आहे.
  • मुकुल रोहतगी यांनी केंद्राचा अॅटर्नी जनरल पदाचा प्रस्ताव फेटाळला
  • ज्येष्ठ अधिवक्ता व्यंकटरामानी यांनी 2010 मध्ये भारतीय कायदा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे.

Attorney General of India: केंद्र सरकारने (Central Govt) ज्येष्ठ वकील आर व्यंकटरामानी  (Senior Advocate RVenkataramani)  यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल   (Attorney General) म्हणून नियुक्ती केली आहे.  केंद्र सरकारने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.  आर के व्यंकटरामानी हे केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांची जागा घेणार आहेत.  30 सप्टेंबरला  केके वेणुगोपाल यांचा कार्यकाळ संपत आहे. ( Senior lawyer R Venkataramani will be the country's new Attorney General )

अधिक वाचा  : थेट लोकल ट्रेनच्या डब्ब्यात महिलांचा गरबा; Video Viral

ज्येष्ठ अधिवक्ता व्यंकटरामानी यांनी 2010 मध्ये भारतीय कायदा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून ते तामिळनाडू राज्यासाठी विशेष वरिष्ठ वकील म्हणून काम करत आहेत आणि आंध्र प्रदेश राज्याचे ते विशेष वरिष्ठ सल्लागार आहेत.  तर 91 वर्षीय वेणुगोपाल यांची जुलै 2017 मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. 29 जून रोजी त्यांची तीन महिन्यांसाठी देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली.  

मुकुल रोहतगी यांनी केंद्राचा अ‍ॅटर्नी जनरल पदाचा प्रस्ताव फेटाळला 

आर व्यंकटरामानी यांची नियुक्ती होण्याआधी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना अ‍ॅटर्नी जनरल होण्याचा प्रस्ताव केंद्राने दिला होता. परंतु रविवारी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले होते की, त्यांनी केंद्र सरकारचा भारताचा पुढील अॅटर्नी जनरल होण्याचा प्रस्ताव नाकारला आहे.  दरम्यान आपल्या या निर्णयामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचे रोहतगी म्हणाले होते. केंद्राने या महिन्याच्या सुरुवातीला रोहतगी यांना विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची जागा घेण्याची ऑफर दिली होती. 

अधिक वाचा  :  मुलीला जन्म दिलेल्या मातांचा नवनीत राणांकडून सत्कार

मुकुल रोहतगी हे जून 2014 ते जून 2017 पर्यंत अ‍ॅटर्नी जनरल होते. त्यांच्यानंतर जुलै 2017 मध्ये वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. 29 जून रोजी देशाच्या सर्वोच्च कायदा अधिकारी पदावर त्यांची तीन महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेणुगोपाल यांनी "वैयक्तिक कारणांमुळे" आपली अनिच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत या पदावर कायम राहण्याची सरकारची विनंती मान्य केली होती. 

अधिक वाचा  : 1 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम

अ‍ॅटर्नी जनरल म्हणून वेणुगोपाल यांचा पहिला कार्यकाळ 2020 मध्ये संपणार होता आणि त्यांनी सरकारला त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, परंतु नंतर त्यांनी नवीन एक वर्षाचा कार्यकाळ स्वीकारला, ककारण ते हाय-प्रोफाइल केसेसमध्ये वकिली करत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी या पदावर राहावे अशी सरकारची इच्छा होती. तसेच त्यांना बारमध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी