पाकिस्तानच्या आर्मीला मोठा धक्का, ले. कर्नलचे अपहरण

senior Pakistani military officer Lt Colonel Laeeq was kidnapped : पाकिस्तानच्या लष्कराला मोठा धक्का बसला आहे. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे.

senior Pakistani military officer Lt Colonel Laeeq was kidnapped
पाकिस्तानच्या आर्मीला मोठा धक्का, ले. कर्नलचे अपहरण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या आर्मीला मोठा धक्का, ले. कर्नलचे अपहरण
  • अपहरणाचे कृत्य बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केल्याचा संशय व्यक्त होत आहे
  • पाकिस्तानचे सैन्य अपहृत उच्चाधिकाऱ्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे

senior Pakistani military officer Lt Colonel Laeeq was kidnapped : पाकिस्तानच्या लष्कराला मोठा धक्का बसला आहे. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी लेफ्टनंट कर्नल लईक आणि त्यांच्या कारचा ड्रायव्हर अशा दोघांचे अपहरण केले आहे. 

अपहरणाचे कृत्य बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army - BLA) या दहशतवादी संघटनेने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पाकिस्तानचे सैन्य अपहृत उच्चाधिकाऱ्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारा तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी लेफ्टनंट कर्नल लईक आणि त्यांच्या कारचा ड्रायव्हर यांची सुटका झालेली नाही. 

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुढे करत हाती शस्त्र घेणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी पाकिस्तानच्या सैन्याच्या चकमकी अनेकदा होतात. मात्र मागील काही महिन्यांत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जास्त सक्रीय झाली आहे. सातत्याने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी हल्ले करत आहे. यावेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने लेफ्टनंट कर्नल लईक आणि त्यांच्या कारचा ड्रायव्हर अशा दोघांचे अपहरण केले आहे. या दोघांच्या सुटकेच्या बदल्यात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तानच्या सैन्यासमोर एखादी मोठी मागणी करण्याची शक्यता आहे. 

याआधी काही दिवसांपूर्वी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या एका महत्त्वाच्या लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. नंतर पाकिस्तानने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी संबंधित सहा जणांना ठार मारले होते. पण लष्करी तळाचे नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले. या घटनेनंतर आता बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने लेफ्टनंट कर्नल लईक यांच्या अपहरणापर्यंत मजल मारली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी