पकडलेल्या चिनी नागरिकाने सांगितली अनेक गुपिते, दोन वर्षांत भारतातून चीनला पाठवली आहेत 1300 सिमकार्ड

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2021 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ज्या चीनच्या नागरिकाला ताब्यात घेतले होते त्याने चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने गेल्या दोन वर्षांत 1300पेक्षाही जास्त सिमकार्ड आपल्या देशात पाठवली.

Chinese citizen arrested by BSF
पकडलेल्या चिनी नागरिकाने सांगितली अनेक गुपिते, दोन वर्षांत भारतातून चीनला पाठवली आहेत 1300 सिमकार्ड 

थोडं पण कामाचं

  • बंगालच्या मालदात पकडलेल्या चिनी नागरिकाकडून खुलासे
  • संशयिताने गेल्या दोन वर्षांत 1300 भारतीय सिम पाठवले चीनला
  • ही तस्करी करण्यासाठी करत असे आंतर्वस्त्रांचा वापर

कोलकाता: भारत (India) आणि बांगलादेशची (Bangladesh) सीमा (border) बेकायदेशीररित्या (illegal) पार करण्याच्या प्रयत्नात पकडल्या (captured) गेलेल्या चीनच्या नागरिकाबाबत (Chinese citizen) आता अनेक खुलासे (revelations) होत आहेत. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत (interrogation) त्याने अनेक गुपिते फोडत सांगितले आहे की त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी (colleagues) आंतर्वस्त्रांमध्ये (undergarments) लवपून सुमारे 1300 भारतीय सिमकार्ड (Indian sim cards) आपल्या देशात पाठवली आहेत. ही सिमकार्ड मिळवण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा (fake documents) वापर केला.

सिमकार्डद्वारे बँकेची खाती होत होती हॅक

चीनच्या हुबेई प्रांतात राहणाऱ्या हान जुनवे याला बीएसएफच्या गस्तपथकांनी गुरुवारी बंगालच्या मालदा जिल्ह्यातून अटक केली होती. अटक केल्यानंतर आरोपीला कारवाईसाठी बंगाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. सीमा सुरक्षा दलांनी जुनवे याला एक वॉन्टेड गुन्हेगार सांगितले आहे. भारतातून तस्करी करून चीनला पोहोचवण्यात आलेल्या सिमकार्डांचा वापर बँकेची खाती हॅक करण्यासाठी आणि आर्थिक फसवणुकीसाठी करण्यात येत होता असेही त्याने सांगितले आहे.

आंतर्वस्त्रांमध्ये लपवत असे सिमकार्ड

बीएसएफने म्हटले आहे, 'जुनवे हा एक वॉन्टेड गुन्हेगार आहे आणि त्याच्या चौकशीत चकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत की तो बनावट कागदपत्रांचा वापर करून साधारण 1300 भारतीय सिमकार्ड चीनला नेत असे. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो सिमकार्ड आंतर्वस्त्रांमध्ये लपवत असे आणि ती चीनला पाठवत असे. त्याचा उद्देश लोकांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याचा होता. त्याला झालेली अटक हे बीएसएफचे मोठे यश आहे.' जुनवेने अधिकाऱ्यांना सांगितले की त्याचा सहकारी सुन जियांगला गेल्या महिन्यांमध्ये लखनऊच्या हदशतवाद विरोधी पथकाने फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती ज्यानंतर त्याला भारताचा व्हीजा घेता आला नाही आणि म्हणून तो भारत-बांगलादेशच्या सीमेवरून आपल्या देशात घुसण्याच्या तयारीत होता. बीएसएफने सांगितले आहे प्रक्रियेनुसार तेव्हापासूनच जुनवेविरोधात इंटरपोलने ब्लू नोटिस जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती.

जुनवे याच्याकडे मिळाली संशयास्पद उपकरणे

बीएसएफने असाही दावा केला आहे की जुनवे याच्याकडे त्यांना मोठ्या प्रमाणात संशयास्पद विद्युत उपकरणे मिळाली आहेत. त्याने चौकशीदरम्यान सांगितले की तो याआधी किमान चारवेळा भारतात आला आहे आणि दिल्लीच्या जवळ गुडगांमध्ये त्याचे एक हॉटेल आहे. बीएसएफने गुरुवारी जारी केलेल्या व्हिडिओ जबानीनुसार तो चुकून भारतात आला होता आणि त्याला लखनऊच्या एटीएससमोर आत्मसमर्पण करायचे होते. त्याने म्हटले आहे की तो ई-कॉमर्सच्या व्यापारासाठी याआधीही भारतात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी