Serial Killer: "सुरक्षारक्षक झोपताच तो मध्यरात्री यायचा आणि..." चार महिन्यात चौघांची हत्या, सिरियल किलर असा झाला गजाआड

Serial killer : महिन्याभरात एक-एक करुन चार जणांची हत्या करणारा सिरियल किलरला अखेर अटक करण्यात आले आहे.

Serial killer who killed 4 security guards in month finally arrest by police madhya pradesh news read in marathi
Serial Killer: "सुरक्षारक्षक झोपताच तो मध्यरात्री यायचा आणि..." चार महिन्यात चौघांची हत्या, सिरियल किलर असा झाला गजाआड 

Serial Killer arrest: रात्री सुरक्षारक्षक झोपले आहेत हे पाहून तो यायचा आणि आपलं काम करुन निघून जायचा. एक-एक करुन महिन्याभरात त्याने चार सुरक्षारक्षकांची हत्या केली होती मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यात ही घटना घडत होती आणि या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. सिरियल किलरला अटक करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर पोलिसांनी सापळा रचत या सिरियल किलरला अटक केली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून आरोपीला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीचं नाव शिवप्रसाद आहे आणि तो सागर जिल्ह्यातील केसली येथे राहणारा आहे. (Serial killer who killed 4 security guards in month finally arrest by police madhya pradesh news read in marathi)

2 तारखेची रात्र

2 मे महिन्यात सागर जिल्ह्यातील रेल्वे ओव्हर ब्रिजखाली एक भयंकर घटना घडली होती. अंडर कन्स्ट्रक्शन ओव्हरब्रिजच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकाची डोक्यात दांडका मारुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. सकाळी जेव्हा या सुरक्षारक्षकाला मृतावस्थेत पाहिलं तेव्हा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर एक-एक करुन आणखी असेच प्रकरणं समोर येऊ लागली.

हे पण वाचा : रणजित ढाले पाटील याच्या 'खऱ्या' भावानं बनवली गणेश मूर्ती

27 ऑगस्ट ची रात्र

यानंतर 16 आठवड्यानंतर पुन्हा अशीच घटना घडली. कॅंट परिसरातील भैंसा गावात ही घटना घडली होती. येथे ट्रकच्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाची सुद्धा त्याच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्याने पहिली हत्या दांडक्याच्या सहाय्याने केली होती तर या सुरक्षारक्षकाची हत्या गॅरेजमधील हातोड्याने सुरक्षारक्षकाची हत्या केली.

हे पण वाचा : काजू चमचमीत लागतात पण...

29 ऑगस्ट रोजी पुन्हा हत्या

27 ऑगस्ट रोजी हत्या झाल्यावर पुन्हा 29 ऑगस्ट रोजी पुन्हा त्याच पद्धतीने आणखी एक हत्या करण्यात आली. सागर जिल्ह्यातील एका कॉलेज परिसरात सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आली. हा सुरक्षारक्षक त्या कॉलेज्या परिसरात असलेल्या कॅन्टिनमध्ये झोपलेला होता. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी पुन्हा एका सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आली.

हे पण वाचा : प्राजक्ता माळीचा फेस्टीव्ह लूक,मानाच्या गणपतींचं दर्शन

का करायचा हत्या ?

सिरियल किलर हत्या का आणि कशासाठी करायचा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचा तपास केला असता हत्येमागचं कुठलंही कारण नसल्याचं समोर आलं आहे.

असा झाला गजाआड

सिरियल किलरच्या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलीस सुद्धा आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, कुठलाही ठोस पुरावा हाती मिळत नव्हता. त्यानंतर एका सीसीटीव्हीत पुसट चेहरा आरोपीचा दिसला. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा स्केच बनवला आणि तपास सुरू केला. त्यानंतर आरोपीला अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी