PM Narendra Modi पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) देशातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा शुभारंभ व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने केला. यात पंढरपूरच्या पालखी मार्गाचा समावेश होता.

Service to Pandharpur is service of 'Shri Narayan Hari': PM Modi
पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे - मोदी 
थोडं पण कामाचं
  • पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे - मोदी
  • पंढरपूरच्या पालखी मार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन
  • व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने भूमीपूजन

Service to Pandharpur is service of 'Shri Narayan Hari': PM Modi । नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) देशातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा शुभारंभ व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने केला. यात पंढरपूरच्या पालखी मार्गाचा समावेश होता. पंढरपूरच्या पालखी मार्गाच्या भूमीपूजन प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते. अषाढी एकादशीचे विहंगम दृश्य कोणीच विसरू शकत नाही. हजारो-लाखो भाविक वारीत सहभागी होतात. शेवटी सर्व पंथ हे भागवत पंथच आहेत.

‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना भगवान विठ्ठलापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. माझं पंढरपूरशी विशेष नातं आहे. भगवान द्वारकाधीश इथे येऊन विठ्ठल रुपात विराजमान झाले आहेत. तसंच माझं काशीशी नातं आहे. उत्तरेत काशी आहे तर दक्षिणेत पंढरपूर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंढरपूरच्या भूमीने संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील; असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

वारकऱ्यांमध्ये पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून स्त्री शक्ती पण पुढे वाटचाल करत आहे. पंढरीची वारी संधीच्या समानतेचे प्रतीक आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हे वारकरी चळवळीचे ब्रीदवाक्य आहे,” असं मोदी म्हणाले. रस्ते विकासाचे द्वार आहेत, असे म्हणतात. पंढरीकडे जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावत आहे, असंही मोदी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी