Gujarat : नवसारीत चालत्या बसमध्ये चालकाला आला heart attack; बस-कारची धडक, 9 ठार

gujarat news, road accident in navsari, several people injured in a collision between a bus and a car in navsari gujarat, Gujarat: Nine dead as bus collides with SUV in Navsari : गुजरातमधील नवसारी येथे आज (शनिवार 31 डिसेंबर 2022) सकाळी कार आणि बस यांची टक्कर झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला

Gujarat: Nine dead as bus collides with SUV in Navsari
नवसारीत चालत्या बसमध्ये चालकाला आला heart attack; बस-कारची धडक, 9 ठार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नवसारीत चालत्या बसमध्ये चालकाला आला heart attack
  • बस-कारची धडक, 9 ठार
  • अनेक जखमी

gujarat news, road accident in navsari, several people injured in a collision between a bus and a car in navsari gujarat, Gujarat: Nine dead as bus collides with SUV in Navsari : गुजरातमधील नवसारी येथे आज (शनिवार 31 डिसेंबर 2022) सकाळी कार आणि बस यांची टक्कर झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 28 जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 येथे हा अपघात झाला. जखमींपैकी 17 जणांवर वलसाडच्या डॉक्टर हाउस येथे उपचार सुरू आहेत. एका जखमी व्यक्तीवर सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

अपघातात मृत्यू झालेले सर्वजण अंकलेश्वर येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस फॉर्च्युनरला धडकली. बस सूरत येथून वलसाडच्या दिशेने जात होती. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे वेसमा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 येथे अपघात झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघात झालेली वाहने रस्त्यावरून बाजुला केली. यानंतर वाहतूक हळू हळू पूर्ववत झाली. 

अपघाताचे फोटो उपलब्ध झाले आहेत. या फोटोंवरून बसच्या पुढील भागाचे अपघातात मोठे नुकसान झाल्याचे दिसते. बस धडकल्यामुळे फॉर्च्युनरचेही प्रचंड नुकसान झाले आहे. 

अपघातानंतर सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवणे, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी (Autopsy / Post-mortem) पाठवणे, क्रेनच्या मदतीने अपघात झालेली बस आणि फॉर्च्युनर उचलून रस्त्याच्या कडेला नेणे आणि वाहतूक सुरळीत करणे यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. 

PM मोदींनी दिलं नवीन वर्षाचं गिफ्ट, आता स्मॉल सेविंग्स स्कीमवर मिळणार जास्त व्याज, PPF आणि SSY मध्ये बदल नाही

Gay Husband: पती होता समलैंगिक, पत्नीला बसला धक्का, कोर्टाने दिले हे आदेश 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी