२०० हून अधिक महिलांना प्राण्यांसोबत SEX करण्यास जबरदस्ती, आरोपी अटकेत

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 22, 2019 | 23:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

पोलिसांनी अशा एका व्यक्तीला अटक केली आहे ज्याने २०० हून अधिक महिलांना सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवलं होतं. तसेच त्यांचं लैंगिक शोषण केल्यावर आरोपीने त्यांना प्राण्यांसोबत सेक्स करण्यास जबरदस्ती करत असे.

sex force man 200 women animal brazil arrest crime news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • ब्राझीलमधील धक्कादायक घटना
  • प्राण्यांसोबत सेक्स करायला तो करत असे जबरदस्ती
  • २००हून अधिक महिलांचं त्याने केलं लैंगिक शोषण
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक 

ब्राझील: एका अशा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे ज्याने २४० महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीने या सर्व महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांना सेक्स स्लेव्ह बनवत त्यांना ब्लॅकमेल केलं. तसेच आरोपीने अज्ञात व्यक्तींसोबत या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. इतकेच नाही तर तो या महिलांना प्राण्यांसोबतही सेक्स करण्यास जबरदस्ती करत असे. या आरोपीला दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपीचं नाव रोनी स्केल्ब असं आहे. आऱोपी रोनी हा सेल्स प्रतिनिधी म्हणून काम करतो. तसेच एका चर्चमध्ये युथ ग्रुप लीडर सुद्धा आहे. पोलिसांनी सांगितले की, ३२ वर्षीय आरोपी रोनी स्केल्ब याने ब्राझीलमधील ११ राज्यांत चार वर्षांच्या कालावधील या महिलांचं लैंगिक शोषण केलं.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने या सर्व महिलांसोबत फेक सोशल मीडिया अकाऊंट आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. आरोपी रोनी हा या महिलांना इंटिमेट व्हिडिओज आणि फोटोज मागवून त्यांना पैसे देत असे. 

महिलांकडून न्यूड फोटोज मिळाल्यावर आरोपी त्यांना बँकेत पैसे ट्रान्सफर केल्याच्या बनावट स्लिप पाठवत असे. यानंतर आरोपी रोनी हा त्या महिलांना ब्लॅकमेल करु लागला. तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना हे फोटो, व्हिडिओ पाठवण्याचं सांगत आरोपी ब्लॅकमेल करत असे. एका पीडित महिलेने सांगितले की, रोनी दिवसातून २०हून अधिकवेळा अशी मागणी करत असे.

रोनीवर आरोप आहे की, त्याने महिलांना ब्लॅकमेल केलं आणि त्यांचा बलात्कार केला. यापैकी कित्येक महिलांना त्याने इतर पुरुषांसोबत आणि काहींना प्राण्यांसोबत सेक्स करण्यास जबरदस्ती केली. तसेच या सेक्सचा व्हिडिओ पाठवण्यासही रोनी जबरदस्ती करत असे. पोलिसांच्या मते, सेक्स करण्यास कुठलाच आक्षेप नाही अशा एका कॉन्ट्रॅक्टवर आरोपीने या महिलांच्या जबरदस्ती सह्या घेतल्या होत्या.

आरोपी रोनी याला ११ ऑक्टोबर रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन सर्व पीडित महिलांना सोडवलं आहे. तसेच एक लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...