Sex In Tourism Sector: सेक्सवर कायदा बनवताच संकटात आलं पर्यटन क्षेत्र, लोकं आली रस्त्यावर

Sex In Tourism Sector: हा कायदा संसदेत पास होण्यासाठी तीन वर्षापासून प्रयत्न केले जात होते. दरम्यान सरकारच्या (government) या निर्णयावर तेथील नागरिक नाराज असून ते या कायद्याला कठोर म्हणत आहेत. विशेषत: पर्यटन क्षेत्रात प्रचंड नाराजी असून याच्याशी संबंधित लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, सरकारचं टार्गेट आहे की, जीडीपीमध्ये टुरिझमचा हिस्सा हा 15 टक्के असला पाहिजे. पण सध्या जीडीपीमध्ये याची हिस्सेदारी ही फक्त 5 टक्के आहे. त्यात नवीन बनविण्यात आलेला कायदा हा पर्यटन क्षेत्र उद्धवस्त करणारा आहे.  (

Sex In Tourism Sector: the tourism sector came into crisis, people came to the streets
सेक्सवर कायदा बनवताच संकटात आलं पर्यटन क्षेत्र  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • पर्यटन क्षेत्रात प्रचंड नाराजी असून याच्याशी संबंधित लोक रस्त्यावर उतरले आहेत.
  • जोको विडोडो सरकारच्या नवीन गुन्हेगारी कायद्याने विनाशाचा मार्ग खुला केला आहे.
  • सरकारने या कायद्याबाबत अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Indonesia :  इंडोनेशियाच्या जोको विडोडो सरकारने मंगळवारी नवीन गुन्हेगारी क्रिमिनल कोड ऑफ कंडक्ट कायदा  (criminal code of conduct)मंजूर केला. दरम्यान हा कायदा संसदेत पास होण्यासाठी तीन वर्षापासून प्रयत्न केले जात होते. दरम्यान सरकारच्या (government) या निर्णयावर तेथील नागरिक नाराज असून ते या कायद्याला कठोर म्हणत आहेत. विशेषत: पर्यटन क्षेत्रात प्रचंड नाराजी असून याच्याशी संबंधित लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, सरकारचं टार्गेट आहे की, जीडीपीमध्ये टुरिझमचा हिस्सा हा 15 टक्के असला पाहिजे. पण सध्या जीडीपीमध्ये याची हिस्सेदारी ही फक्त 5 टक्के आहे. त्यात नवीन बनविण्यात आलेला कायदा हा पर्यटन क्षेत्र उद्धवस्त करणारा आहे.  (As soon as the law on sex was made, the tourism sector came into crisis, people came to the streets)

अधिक वाचा  :  हुशार डोक्याची माणसं अवघ्या 11 सेंकदात शोधतील पोरगी

दरम्यान, BBCने इंडोनेशियाच्या नवीन कायद्याबाबत सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार - कोविडच्या काळातून सावरण्याचा प्रयत्न असताना जोको विडोडो सरकारच्या नवीन गुन्हेगारी कायद्याने विनाशाचा मार्ग खुला केला आहे.  एका मानवाधिकार कार्यकर्त्याने सांगितले की, या नव्या कायद्यामुळे जगामध्ये इंडोनेशियाची प्रतिमा खराब होईल आणि त्याचा थेट परिणाम लाखो लोकांच्या रोजगारावर होईल, अशी भीती सर्वसामान्यांना आहे.

अधिक वाचा  : लग्नसमारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट, 60 जण होरपळले

कायद्यापेक्षा वाईट काहीही असूच शकत नाही. दरम्यान इंडोनेशियाच्या या कायद्यामुळे ऑस्ट्रेलिया नाराज झाला आहे. कारण बहुतेक ऑस्ट्रेलियन  पर्यटक  इंडोनेशियामध्ये येतात. ऑस्ट्रेलिया मीडियानुसार- इंडोनेशियाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली असून आता आमचे लोक तिकडे जाणे टाळतील. त्यांना कडक कायद्याची भीती वाटेल.

सरकारकडून स्पष्टीकरण

आतापर्यंत सरकारने या कायद्याबाबत अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना , विडोडोचे अधिकारी म्हणाले की, पर्यटकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. संबंधित व्यक्तीची मुले, आई-वडील किंवा पत्नी तक्रार करतील तेव्हाच त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. मात्र, या खुलाशावर खूश होण्याऐवजी लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भयंकर चूक करून सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत. 

अधिक वाचा  :लग्नसमारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट, 60 जण होरपळले

अनेक ऑस्ट्रेलियन लोक इंडोनेशियामध्ये लग्न करण्यासाठी येतात. त्यांच्या दृष्टीने हा अतिशय सुंदर आणि कमी खर्चाचा देश आहे. अनेक ऑस्ट्रेलियनही वर्षातून तीन-चार वेळा इथे भेट द्यायला येतात. परंतु त्यांना भिती आहे की त्यांच्याकडे  लग्नाचा दाखला नसेल तर त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये राहता येणार नाही. अविवाहित जोडपी आता इथे न येण्याचा विचार करत आहेत. 

सरकार कितीही म्हणत असलं तरी लोकांना या कायद्याची भिती वाटत आहेत. एक इंडोनिशिया रिसर्चर आंद्रियास हार्सोनो म्हणाले की, सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे? समजा एखाद्या ऑस्ट्रेलियन माणसाची इंडोनेशियन मैत्रीण असेल तर तो तिच्यासोबत हॉटेलमध्ये कसा राहू शकतो? मुलीच्या घरच्यांनी तक्रार केल्यास त्या तरुणाला तुरुंगात जावे लागेल.2019 मध्ये केवळ ऑस्ट्रेलियातून 1.3 दशलक्ष पर्यटक इंडोनेशियामध्ये आले होते. सरकारी आकडेवारीनुसार, जुलै 2022 पर्यंत 4 लाख 70 हजार विदेशी पर्यटक इंडोनेशियामध्ये आले होते. फिल रॉबर्टसन, संशोधक म्हणतात- आता इंडोनेशियाचे पर्यटन क्षेत्र नष्ट होणार आहे.  याला येथील सरकार जबाबदार असेल.

नवीन कायद्यात काय आहे

नव्या कायद्यानुसार पत्नीशिवाय इतर कोणाशीही संबंध ठेवल्यास तुरुंगवास होईल. अविवाहितांनीही सेक्स केला तर तेही गुन्ह्याच्या कक्षेत येईल.  याशिवाय आणखी दोन गोष्टींना विरोध होत आहे. प्रथम- राष्ट्रपतींविरुद्ध बोलणे हा गुन्हा मानला जाईल. दुसरी- राष्ट्रीय विचारधारा म्हणजेच राष्ट्रीय विचारसरणीला विरोध करणे हे देखील गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.

अधिक वाचा : राज्यपालांच्या विरोधात दिल्लीत शिवसेना खासदार आक्रमक

कायद्याची गरज का आहे

इंडोनेशिया हा सामान्यतः उदारमतवादी समाज मानला जातो. आता नव्या फौजदारी कायद्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.याचे कारण असे की या आग्नेय आशियाई देशातील काही लोक नवीन कोडला इराणच्या धर्तीवर नैतिकता पोलिसिंगच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहत आहेत.  तर सरकार म्हणत आहे की, ते क्रिमिनल जस्टीसला  सिस्टमला नवीन रुप देणार आहे. जेणेकरुन ते अद्यावत राहील. 

सरकार म्हणते – सध्या गुन्हेगारी संहिता किंवा गुन्हेगारी कायदा प्रणाली जी गुलामगिरीच्या युगाची आहे. यामध्ये बदलाची नितांत गरज आहे. बदलत्या काळानुसार आपला कायदा बदलला पाहिजे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सरकारने पहिल्यांदाच या विधेयकाची माहिती दिली होती आणि त्याचवेळी विरोध सुरू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी