स्पा सेंटरच्या नावाखाली चालवलं जात होतं ‘सेक्स रॅकेट’, ११ तरुणी ताब्यात

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2019 | 11:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sex Racket In Delhi: दिल्ली पोलिसांनी रोहिणी परिसरातील एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं आहे. पोलिसांनी यावेळी ११ तरूणींना ताब्यात घेतलं आहे.

sex racket_getty images
सेक्स रॅकेट  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगच्या पथकाने सोमवारी केलेल्या छापेमारीत रोहिणी येथील एका मॉलमध्ये स्पा सेंटरवर छापा मारत तेथे चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली महिला आयोगाला एका व्यक्तीने लेखी स्वरूपात तक्रार नोंदवली होती. रोहिणीच्या सीटी सेंटर मॉलमध्ये अट्रॅक्शन स्पा असून या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकट सुरु असलेल्याची माहिती मिळाली होती. महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार स्वतःला पत्रकार सांगणाऱ्या एका व्यक्तीने याबद्दल त्यांना माहिती दिली होती.

पत्रकाराने त्यांना सांगितले की, त्याला रोहिणीच्या सीटी सेंटर मॉलमध्ये असलेल्या अट्रॅक्शन स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकट सुरु असल्याचा संशय आला तेव्हा तो स्वतः ग्राहक बनून मॉलमधील स्पा सेंटरमध्ये गेला होता. स्पामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला मुली आॅफर केल्या गेल्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या किंमतीही सांगण्यात आल्या.' 

या सेक्स रॅकेटबद्दल कळताच दिल्ली महिला आयोगाची टीम स्पा सेंटरमध्ये पोहोचली आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली. या छाप्यामध्ये ११ महिलांना पकडण्यात आले असून त्या महिला सेक्स वर्कर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यां महिलांना प्रशांत विहार पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले आणि त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

यासंबंधी पोलिसांनी एक एफआयआर फाईल केली असून आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. दिल्ली महिली आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पोलिसांना नोटीस पाठवत या केसमध्ये अद्याप कोणालाही अटक का नाही झाली? याचे उत्तर मागितले आहे. याव्यतिरिक्त महिला आयोगाने महिला व बालकल्याण मंत्रालयालाही नोटीस पाठवली आहे.

स्वाती मालिवाल यांनी सांगितले की, 'वेश्या व्यवसाय राजधानीमध्ये खूप दिवसांपासून चालत आला आहे. अनेक स्पा सेंटर्सने या व्यवसायाला खतपाणी घातलं आहे. पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं आहे.'  

पुढे त्या असंही म्हणाल्या की, “मला समजत नाही कि पोलीस आणि महिला व बाल कल्याण मंत्रालय याविरूद्ध कठोर कारवाई का करत नाही?, स्पा सेंटरची वेळोवेळी तपासणी होणं गरजेचं आहे. ज्यामुळे महिलांशी निगडित सेक्स रॅकेटची माहिती मिळू शकेल.”

दरम्यान, याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत असून स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांचाही शोध घेण्यात येत आहे. पण अद्याप तरी पोलिसांच्या हाती कुणीच लागलेलं नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
स्पा सेंटरच्या नावाखाली चालवलं जात होतं ‘सेक्स रॅकेट’, ११ तरुणी ताब्यात Description: Sex Racket In Delhi: दिल्ली पोलिसांनी रोहिणी परिसरातील एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं आहे. पोलिसांनी यावेळी ११ तरूणींना ताब्यात घेतलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles