स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Sex racket busted: स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. 

Spa
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • स्पा सेंटरमध्ये सुरू होता सेक्स रॅकेट 
  • पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींची केली सुटका 
  • एका आरोपीला पोलिसांनी केली अटक

राजकोट : गुजरातमधील राजकोट (Rajkot) येथील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket busted) पोलिसांनी केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी ही कारवाई केली असून एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव दिपेन असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील मावडी रोड येथील न्यू जलाराम सोसायटी जवळ असलेल्या स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटरमधून तीन महिलांची सुटका केली आहे. या महिला दिल्ली, राजस्थान आणि मणिपूर येथील निवासी आहेत. 

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर चौकशीत माहिती समोर आली आहे की, हे सेक्स रॅकेट चालवण्यात आणखी एका तरुणाचाही समावेश होता. पोलीस उप निरीक्षक अन्सारी यांनी माहिती दिली की, संदीप नावाचा तरुणा या सेक्स रॅकेट चालवण्यात सहभागी होता. त्याचा शोध आम्ही घेत आहोत. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपेन याने चौकशीत पोलिसांना सांगितले की प्रत्येक ग्राहकाकडन तो २,३०० रुपये घेत होता आणि वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना १,५०० रुपये द्यायचा. 

काही दिवसांपूर्वी मुंबईत सीबीआयची कारवाई 

काही दिवसांपूर्वी सीबीआयने मुंबईस्थित एका टीव्ही कलाकाराविरोधात गुन्हा दाखल केला. या कलाकारावर आरोप आहे की तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सेक्स रॅकेट चालवतो. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी हा अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियाई देशातील १० ते १६ वर्षीय तब्बल १००० अल्पवयीनांशी संपर्क करुन चाईल सेक्स रॅकेट चालवायचा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी