SEX करण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या करुन कापले स्वत:चं गुप्तांग

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 07, 2019 | 17:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sex and Murder: पती-पत्नीत जसं प्रेम असतं त्याच प्रमाणे वादही होत असतात. मात्र, उत्तरप्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने संतापाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

Man killed wife
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • सेक्सला नकार दिल्याने हत्या
  • आरोपीने कापले स्वत:चे गुप्तांग
  • उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. कथित स्वरूपात या पत्नीने त्याच्यासोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या या पतीने पत्नीची हत्या केली त्यानंतर त्याने स्वत:चं गुप्तांग कापलं. यामुळे गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर गोरखपूर येथील बाबा राघव दास मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरु आहेत. त्याच्या पत्नीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचं एका वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं आणि तो कामानिमित्त सूरत येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या घरी परत आला होता. आरोपीचं वय २४ वर्षे असून मृतक महिलेचं वय २१ वर्षे होतं. रिपोर्ट्सनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पती-पत्नी हे दोघेच घरात होते. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पतीने तिची हत्या केली. यावेळी पत्नीचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला.

पीडित महिलेचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून डोकावून पाहिलं. यावेळी पीडित महिला खाली पडलेली दिसली. तर तिच्या पतीच्या अंगावर रक्ताचे डाग दिसत होते. यानंतर शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यानंतर डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलनेजमध्ये रेफर केलं. तर पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

रुग्णालयात मीडियासोबत बोलताना आरोपीने म्हटलं की, माझ्या पत्नीला वारंवार विनंती करुनही तिने सेक्सला नकार दिला त्यामुळे मला राग आला आणि मी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मी माझं गुप्तांग कापलं. सिद्धार्थनगरचे पोलीस अधिक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या वडिलांनी कथित स्वरूपात तक्रार दाखल केली आहे की त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी