मुंबई: मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) सायबर सेलने (cyber cell) एका सेक्स्टॉर्शन रॅकेटचा (sextortion racket) पर्दाफाश केला आहे. या रॅकेटशी संबंधित संशयित आरोपी पॉर्न फिल्म्स (porn films) आणि फोटोंच्या (photos) द्वारे लोकांना ब्लॅकमेल (blackmail) करत असत आणि त्यांना शिकार बनवत. पोलिसांनी याच्याशी संबंधित तीन लोकांना वेगवेगळ्या राज्यांमधून ताब्यात घेतले आहे. एक आरोपी राजस्थान (Rajasthan), दुसरा हरियाणा (Haryana) आणि तिसरा मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी काही राजकीय नेते (political leaders), माध्यमकर्मी (media personnel) आणि अधिकाऱ्यांच्या (officers) सोशल मीडिया प्रोफाईलचा (social media profiles) अभ्यास करून त्यांना निशाणा बनवत असत. यासाठी महिलांच्या नावे खोटी प्रोफाईल (fake profile) तयार करत. याप्रकरणात संशयितांनी पूजा शर्मा या नावाचा वापर केला होता.
बनावट प्रोफाईल बनवल्यानंतर हे गुन्हेगार प्रसिद्ध व्यक्तींना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवत. यानंतर त्यांच्याशी संवाद साधत आणि मैत्री करत. आधी मेसेज आणि नंतर व्हॉट्सअॅपवर हे काम केले जाई. नंतर आठवड्याच्या शेवटी सुट्टीच्या दिवशी अचानक संशयितांकडून त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला जाई ज्याची सुरुवात एखाद्या पॉर्नची क्लिप किंवा पॉर्न व्हिडिओने होई. हा व्हिडिओ पाहणारी व्यक्ती त्यांची शिकार होत असे. संशयित आरोपी हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत आणि नंतर व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ तयार करत. यानंतर पुन्हा पीडित व्यक्तीला फोन केला जाई आणि त्याच्यावर समोरच्याच्या पत्नीला किंवा बहिणीला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला जाई.
यानंतर पीडित व्यक्तीला धमकी दिली जायची की तिचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलला जाईल आणि सोशल मीडियावर शेअर केला जाईल. आधी मागितलेली रक्कम छोटी असे. 2000 ते 5000 रुपयांपर्यंत. मात्र एकदा पैसे दिले की नंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळले जात. या संपूर्ण काळात कधीही पीडित व्यक्तीशी फोनवर संभाषण होत नसे. फक्त मेसेजवरच बोलणे होई. यातील एक आरोपी फक्त राजकीय व्यक्तींनाच जाळ्यात ओढत असे तर दुसरा माध्यमक्षेत्रातील व्यक्तींना निशाणा बनवत असे तर तिसरा बॉलिवुडच्या काही व्यक्तींना अडकवण्याच्या प्रयत्नात होता.
मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस विभागाने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. तपासात समोर आले की या संशयितांनी सोशल मीडियावर वेगवेगळे भाग आणि समूह तयार केले आहेत ज्याद्वारे ते आपल्या सावजांना हेरत असत. त्यांना पकडल्यानंतर पूजा शर्मा या नावाने बनवलेले 171पेक्षा जास्त फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच 50पेक्षा जास्त मोबाईल जप्त करण्यात आले आहेत आणि अनेक बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. काही अज्ञात राजकीय व्यक्तींनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.