बायकांवर नवऱ्याकडूनच लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, धक्कादायक आकडेवारीनं महिलांची वाढली चिंता

कर्नाटकमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार आणि मणिपूर तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा क्रमांक आहे. या पाठोपाठ महिलांवरील अत्याचाराच्या बाबतील तेलंगणा चौथ्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश पाचव्या क्रमांकावर आहे.

Sexual or physical abuse of women by their husbands
बायकांवर नवऱ्याकडूनच लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महिलेचा तिचा पती किंवा कुटुंबातील सदस्य महिलेवर हिंसाचार करत असतो.
  • Stats Of India ने महिलांवरील अत्याचाराचा आकडा जाहीर केला आहे.
  • शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराचं प्रमाण अधिक

मुंबई : देशभरात दर दिवशी महिलांवर (women)अत्याचार होत असून हे प्रमाण वाढू लागले आहे.  महिलांवरील हिंसाचार (tortured), शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण (Sexual or physical abuse) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान महिलांवरील अत्याचाराविषयीची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, भारतात 3 पैकी 1 महिला शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे.  Stats Of India मध्ये ही धक्कादायक आणि चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ( Sexual or physical abuse of women by their husbands, shocking statistics)

अधिक वाचा  :  महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करणार - लोणीकर

दरम्यान अनेक प्रकरणांमध्ये महिलेचा तिचा पती किंवा कुटुंबातील सदस्य महिलेवर हिंसाचार करत असल्याचं या आकडेवारीत सांगण्यात आले आहे.   NFHS-5 2019-21 च्या सुत्रांनुसार 62 हजार 381 महिलांवर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्टॅट्स ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहिर केली आहे. Stats Of India च्या आकडेवारीनुसार, भारतात तीन पैकी एक महिला तिचा नवऱ्याच्या शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे.  विशेष म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराचं प्रमाण अधिक असल्याचेही समोर आलं आहे.

अधिक वाचा  : कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर संभाजीराजेंचं PM ला पत्र

 शहरी भागातील 24 टक्के महिलांना पतीच्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर ग्रामीण भागातील 32 टक्के महिलांना या हिंसाचाराचा सामना करावा लागतो. दरम्यान या आकडेवारीत  महिलांसाठी सहा राज्य सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. या सहा राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. या सहा राज्यांमध्ये 18 ते 49 वय असणाऱ्या विवाहित महिलांचा त्यांच्या पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक छळ झाल्याचे सांगण्यात आले आहे.  या सहा राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.

कर्नाटकमध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार आणि मणिपूर तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा क्रमांक आहे. या पाठोपाठ महिलांवरील अत्याचाराच्या बाबतील तेलंगणा चौथ्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश पाचव्या क्रमांकावर आहे.

महिलांवरील अत्याचारासंदर्भात आकडेवारी

कर्नाटक : 44 टक्के
बिहार : 40 टक्के
मणिपूर : 40 टक्के
तमिळनाडू : 38 टक्के
तेलंगणा : 37 टक्के
उत्तर प्रदेश : 35 टक्के
 
दरम्यान, पतीने दारू प्यायल्यावर पत्नीला मारहाण केल्याच्याही अनेक घटना आहेत. आकडेवारीनुसार, 70 टक्के महिलांना त्यांच्या पतीकडून दारू प्यायल्यानंतर मारहाण करण्यात आली. तर 23 टक्के महिलांना नवऱ्याने दारु न पिताही मारहाण केली आहे. म्हणजेच फक्त व्यसन हेच हिंसाचाराचं कारण नाही. इतकंच नाही तर 77 टक्के महिला अशा आहेत ज्यांच्या शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचार झाला आहे, पण त्यांना त्याबद्दल कोणालाही सांगितलं नाही किंवा कुणाचीही मदत मागितली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी