पैशांकरिताच आर्यन खानची अटक? 'शाहरुखकडे 25 कोटींची मागणी, वानखेडेंना मिळणार होते 8 कोटी!' बॉडिगार्डचा धक्कादायक गौप्यस्फोट

सध्या देशात चर्चेत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.  आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली.

Arrest of Aryan Khan for money? Wankhede was to get Rs 8 crore! '
पैशांकरिताच आर्यन खानची अटक? वानखेडेंना मिळणार होते 8 कोटी!'  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला.
  • प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक 1 चा साक्षीदार आहे.
  • समीर वानखेडे यांना या प्रकरणात 8 कोटी रुपये मिळणार होते.

मुंबई : सध्या देशात चर्चेत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.  आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने ही एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे. या प्रकरणात लाखोंची डील झाल्याचा दावा गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने केला आहे.

माध्यमांशी बोलताना साईल यांनी क्रूझवरील छाप्यावेळी 2 ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, असा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक 1 चा साक्षीदार आहे. एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईलनं गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. सईलने सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो. 

साईल याने गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावले असे दिसत आहे.  याच 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असे बोलणे सुरू होतं, असा दावा देखील साईलने केला आहे.

कोण आहे प्रभाकर साईल

क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारा पंच

हा पंच  किरण होसावी यांचा बॉडीगार्ड 

किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था

प्रभाकर साईल इतके दिवस शांत का राहिला?

साईलनं सांगितले की, मी शांत राहिलो कारण माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे. मला राहतं घर नाही. मी गोसावींकडे 24 तास ड्युटी करायचो. तिथेच राहायचो, खायचो. मला काही दिवसांनंतर नंतर मिसेसचा फोन आला की त्यांना फोन येतायेत पोलिसांचे. मला भीती वाटली की माझ्या फॅमिलीकडे पोलिस का येतायेत. स्वाभिमान रिपब्लिक पार्टीच्या संस्थापकांकडे मी आलो आणि आता त्यांच्या छत्रछायेखाली आहोत. मला कारवाईनंतर दोन दिवस फोन स्विच ऑफ करायला लावला. माझा पगार त्यांच्याकडे बाकी आहे. इतक्या दिवसांत माझा कुणाशीच संपर्क नाही.  मला भीती वाटतेय की मी पंच म्हणून उभा राहिलोय.  मला समीर वानखेडेंकडून धोका आहे, असंही प्रभाकर साईलनं म्हटलं आहे.

क्रुझ कारवाईचा सांगितला सर्व घटनाक्रम

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कशाप्रकारे सर्वांना पकडले याची माहिती बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने दिली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात किरण गोसावी सुरवातीपासूनच वानखेडेंसोबत होता. कशाप्रकारे आर्यन खानसह इतरांना पकडण्यात आले. याची सर्व माहिती त्याने दिली आहे. किरण गोसावी अहमदाबावरून आल्यानंतर थेट मुंबई दाखल झाला. एनसीबीच्या कार्यालयातून ते क्रूझ ठिकाणी गेले. साडेदहा पावणे अकरा वाजता क्रूझमधील अनेकांना पकडण्यात आले होते. आर्यन खानही त्यात होता. त्याला वेगळं बसवण्यात आले होते. आणखी 7 ते 8 जण तिथे होते. मी यासर्वांचे आपल्या मोबाइलमध्ये गुपचूप फोटोही काढले. किरण गोसावी आर्यन खानला घेऊन एनसीबीच्या कार्यालयात गेले, असा दावा या प्रभारकर साईलने केला आहे.

पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून आपली सही कोऱ्या कागदांवर घेतली गेली. 9 ते 10 कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या. आपल्याकडून आधार कार्ड मागितल्यावर. पण ओरिजनल आधारकार्ड नसल्याने समीर वानखेडेंनी त्यांचा नंबर दिला आणि आपण आधार कार्ड व्हॉट्सअॅप केलं. त्यावेळी रात्री अडीच पावणे तीन वाजता आम्ही एनसीबीच्या कार्यालयातून खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावीना सॅम नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. एनसीबी ऑफिसपासून ५०० मीटर अंतरावर एका डाव्याबाजूला त्यांची मिटींग झाली. मिटींगमध्ये त्यांची काहीतरी डील झाली, असे साईल याने सांगितले.

लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारात सॅम, किरण गोसावी आणि एसआरकेची मॅनेजर होती. त्या तिघांमध्ये मिटिंग झाली. यानंतर त्यानी कारमधूनच आपल्याला फोन केला '25 कोटींचा बॉण्ड' करायला सांगितला. त्यातील 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचेत आणि 10 आपल्याला वाटायचे आहेत, असे ते म्हणाले. पैशांसाठी आम्ही पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो. पण न मिळाल्याने आम्ही वाशीला घरी निघून आलो. यानंतर काही वेळाने लगेच किरोण गोसावीनी आपल्याला महालक्ष्मी स्टेशनजवळ ताडदेवजवळ इंडियाना हॉटेलजवळ थांबायला सांगितलं. यानुसार आपल्याला एका कारमधून 50 लाख रुपये घेण्यास सांगितले. 5102 असा या कारचा क्रमांक होता, असा दावा साईलने केला आहे.

आपल्याला संध्याकाळी साडेचार वाजता गोसावींचा पुन्हा फोन आला. त्यांनी वाशी पुलाजवळ बोलावलं. त्यानंतर इनॉर्बिट मॉलजवळ बोलावलं. त्यांनी आपल्या कारमधील पैशाची पिशवी दिली. सॅम नावाच्या व्यक्तीला चर्चगेटला ती परत देण्यास सांगितलं. सॅमने पैसे मोजले तर ते 38 लाख रुपयेच निघाले. यात 38 लाख रुपये आहे, असं सॅमने सांगितलं. तर हे किरण गोसावींशी बोला. आपल्याला यातलं काही माहिती नाही. त्यांचं बोलणं झालं आणि किरण गोसावीनी बाकिचे पैसे दोन दिवसात देतो असं सांगितलं. यानंतर किरण गोस्वामींच्या पुण्यातील प्रकरणाचे व्हिडिओ आपण बघितले, असं दावा साईलने केला आहे.

एक व्हिडिओ जारी करून प्रभाकर साईल याने हा दावा केला आहे. सामीर वानखेडेंची आपल्याला भीती वाटत आहे. कारण पत्नीला पोलिसांचे चौकशीसाठी फोन आले होते. तिने आपल्याला हे सांगितलं. यामुळे कुटुंबाला काही झालं, तर मी कुणासाठी जगायचं. म्हणून मी हा व्हिडिओ जारी केला आहे. यामार्फत सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रभारकर साईलने म्हटले आहे.

कोण आहे किरण गोसावी?

पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार  पोलीस दलात नोकरी करून निवृत्त झालेले प्रकाश गोसावी यांचा मुलगा हा किरण गोसावी आहे. सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. गेली अनेक वर्षे ते ठाण्यातील ढोकळी इथं एका सोसायटीमध्ये राहतात. किरणचे बी कॉमपर्यंत शिक्षण झालेले आहे, किरण विवाहित असून त्याला 10 वर्षाचा मुलगा आहे. किरणला त्याच्या पत्नीने सहा वर्षांपूर्वीच घटस्फोट दिलेला असलायची माहिती समोर येत आहे.

किरणमुळे गेली अनेक त्याच्या कुटुंबियांना त्रास होत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.  एकूणच किरण गोसावी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याचे शोधमोहीम येथून समोर आले आहे. असे असताना एन सी बी किरण गोसावीला मुख्य साक्षीदार म्हणून सांगत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी