भाजप नेत्यावर चप्पल फेकणारा शक्ती भार्गव कोण ?  जाणून घ्या त्याच्याबद्दल काही गोष्टी 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2019 | 20:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका पत्रकार परिषदेदरम्यान, एका व्यक्तिनं व्यासपीठावर बसलेल्या भाजपच्या नेत्यावर चप्पल फेकून मारली. भाजप नेत्यावर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव शक्ती भार्गव आहे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

Shakti bhargav
भाजप नेत्यावर चप्पल फेकणारा शक्ती भार्गव कोण ?  जाणून घ्या त्याच्याबद्दल काही गोष्टी   |  फोटो सौजन्य: Facebook

नवी दिल्ली:  आज दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात एका पत्रकार परिषदेदरम्यान, एका व्यक्तिनं व्यासपीठावर बसलेल्या भाजपच्या नेत्यावर चप्पल फेकून मारली. भाजपचे प्रवक्ते आणि खासदार जीव्हीएल नरसिम्हा हे पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देत असताना त्यांच्या समोरच बसलेल्या एका व्यक्तीने अचानक त्यांच्या दिशेने आपल्या पायातील चप्पल काढून फेकून मारली. सुदैवाने ही चप्पला नरसिम्हा यांना लागली नाही. पण या प्रकारामुळे सभागृहात काहीसा गोंधळ निर्माण झाला. पण त्यानंतर येथे उपस्थित असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पकडून सभागृहाच्या बाहेर नेलं.  

दरम्यान भाजप नेत्यावर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव शक्ती भार्गव आहे. शक्ती सध्या मालमत्तेची खरेदी, अज्ञात आणि अघोषित उत्पन्नाच्या बाबतीत, आयकर विभाग तपासणीचा सामना करत आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात भाजपचे नेते जीव्हीएल नरसिम्हा राव पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी शक्ती यांनी जीव्हीएल यांच्या दिशेनं चप्पल भिरकवली. ही चप्पल जीव्हीएल यांना लागली नाही. 

मीडियाच्या रिपोर्टनुसार, शक्ती भार्गव हा भार्गव हॉस्पिटलसह अन्य कंपन्यांचा संचालक आहे. शक्तीनं जवळपास ११.५ कोटी रूपये देऊन तीन बंगले खरेदी केले. शक्तीनं हे तिन्ही बंगले आपली पत्नी, मुलं आणि नातेवाईंकाच्या नावावर खरेदी केली आहेत. स्वतःला व्हिस्टल ब्लोअर असल्याचा दावा करणाऱ्या शक्तीविरोधात त्याच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. शक्तीच्या आई वडिलांनी त्याच्या आणि पत्नीच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. शक्ती यांच्या आई वडिलांचा आरोप आहे की,  त्यानं फसवणूक करत तीन बंगले त्याच्या पत्नी, नातेवाईक आणि मुलांच्या नावावर केले आहेत. शक्ती यांच्या आई वडिलांचं मत आहे की, आम्ही या तिन्ही संपत्ती खरेदी केल्या होत्या. 

हे तिन्ही बंगले शक्तीच्या आई वडिलांनी ११ कोटी रूपयांना खरेदी केले होते. त्यानंतर शक्तीनं फसवणूक करत तिन्ही बंगले ११.५ कोटी रूपयांना खरेदी केले. इंडिया टुडे टीव्हीच्या रिपोर्टनुसार, शक्ती भार्गवचे वकिल अभिषेक अत्रेनं दावा केला की, शक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे आणि तो कोणावरही सहजपणे विश्वास ठेवत नाही. शक्ती पॅरोनिया असा आजाराचा बळी ठरला आहे.

रिपोर्टनुसार आयकर विभागाच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी २०१८ मध्ये लखनऊ, कानपूर आणि वाराणसीमध्ये भार्गव आणि त्याच्या सहकार्याच्या संबंधित परिसरात तीन दिवस शोध घेतला होता. याचदरम्यान विभागानं २८ लाख रूपये आणि ५० लाख रूपये किंमतीचे दागिनं जप्त केले. सुत्रांचं म्हणणं आहे की, त्यानंतर शक्तीची चौकशी करण्यात आली. मात्र या तीन संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेले १० कोटी रूपयांपेक्षा जास्तची रक्कमेचं स्रोतबद्दल शक्तीला काही सांगता आलं नाही. 

याव्यतिरिक्त अधिकाऱ्यांना शक्ती भार्गव आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या ८ कंपन्यांबद्दल माहिती मिळाली. शक्तीच्या या कंपन्यांबद्दल आयकर विभाग आणि अन्य एजन्सींना माहिती नव्हती. या सर्व घटनांमध्ये त्याच्याविरोधात चौकशी सुरू आहे. भाजप नेत्यावर चप्पल फेकण्याच्या प्रकरणी शक्तीला आयपी स्टेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. शक्ती भार्गवच्या फेसबुक पोस्ट्स पाहिल्यावर समजतं की, शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भाजप नेत्यावर चप्पल फेकणारा शक्ती भार्गव कोण ?  जाणून घ्या त्याच्याबद्दल काही गोष्टी  Description: एका पत्रकार परिषदेदरम्यान, एका व्यक्तिनं व्यासपीठावर बसलेल्या भाजपच्या नेत्यावर चप्पल फेकून मारली. भाजप नेत्यावर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव शक्ती भार्गव आहे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
Loading...
Loading...
Loading...