मोदी सरकारच्या राज्यमंत्र्याने सोडला पक्षाचा Whatsapp Group

Shantanu Thakur Quits BJP WhatsApp Group : पश्चिम बंगाल भाजपमध्ये दिलीप घोष गटाचे वर्चस्व वाढले आहे. यामुळे नाराज झालेले मोदी सरकारचे राज्यमंत्री शांतनु ठाकुर यांनी पश्चिम बंगाल भाजपशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला.

Shantanu Thakur Quits BJP WhatsApp Group
मोदी सरकारच्या राज्यमंत्र्याने सोडला पक्षाचा Wahtsapp Group 
थोडं पण कामाचं
  • मोदी सरकारच्या राज्यमंत्र्याने सोडला पक्षाचा Whatsapp Group
  • तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार नाही - शांतनु ठाकुर
  • नाराजीचे कारण पश्चिम बंगालमधील राजकारण

Shantanu Thakur Quits BJP WhatsApp Group : नवी दिल्ली : पश्चिम बंगाल भाजपमध्ये दिलीप घोष गटाचे वर्चस्व वाढले आहे. यामुळे नाराज झालेले मोदी सरकारचे राज्यमंत्री शांतनु ठाकुर यांनी पश्चिम बंगाल भाजपशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला. 'महत्त्वच दिले जाणार नसेल तर कशाला राहावे' असे सूचक वक्तव्य शांतनु ठाकुर यांनी केले. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत नसल्याचे शांतनु ठाकुर म्हणाले.

मातुआ समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शांतनु ठाकुर यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री हे पद देण्यात आले. मोदी सरकारमध्ये शांतनु ठाकुर जहाज वाहतूक, बंदर, जलमार्ग या विभागांचे राज्यमंत्री आहेत. ते २४ परगणा जिल्ह्यातील बोनगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे शांतनु ठाकुर आनंदात होते. पण अलिकडेच ते नाराज झाले. या नाराजीचे कारण पश्चिम बंगालमधील राजकारण हे आहे.

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी पक्षाच्या अनेक समित्यांचे सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, विभाग प्रभारी, विभाग समन्वयक यांची यादी जाहीर केली. या यादीत मातुआ समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. पक्षातले दिलीप घोष गटाचे वर्चस्व वाढले. यामुळे शांतनु ठाकुर नाराज झाले आहेत. याआधी दिलीप घोष प्रदेशाध्यक्ष होते तेव्हाही शांतनु ठाकुर यांना जास्त महत्त्व दिले जात नव्हते. ताज्या घडामोडींनंतर नाराजी व्यक्त करण्यासाठी शांतनु ठाकुर यांनी पश्चिम बंगाल भाजपशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला. शांतनु ठाकुर यांच्या पाठोपाठ असीम सरकार, अंबिका रॉय, सुब्रत ठाकुर, मुकुट मणि अधिकारी, अशोक कीर्तनिया या पाच आमदारांनीही पश्चिम बंगाल भाजपशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्यानंतर शांतनु ठाकुर तसेच असीम सरकार, अंबिका रॉय, सुब्रत ठाकुर, मुकुट मणि अधिकारी, अशोक कीर्तनिया यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा (जगतप्रकाश नड्डा) यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. नड्डा यांनी सर्व बाजू समजून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू; असे संकेत दिल्याचे समजते.

पुन्हा एकदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या आणि कोरोना संकटाला सुरुवात झाली. यामुळे पश्चिम बंगालमध्ये सीएएची अंमलबजावणी अडचणीत सापडली आहे. याच कारणामुळे  मातुआ समाजात नाराजीचे वातावरण आहे. भाजपला सीएएसाठी मतदान करणाऱ्या मातुआ समाजाला अन्य मुद्यांवर आश्वासन देऊन तृणमूल काँग्रेस स्वतःकडे वळविण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून शांतनु ठाकुर अस्वस्थ आहेत. ते सीएएची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी आग्रही आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी