झारखंड निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया 

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 23, 2019 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशात जो बदल घडत आहे, त्या बदलशी झारखंडच्या जनतेने हात मिळवणी केली असून मी देशाला नव्या दिशेने नेण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल झारखंडच्या जनतेचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

sharad pawar first reaction on jharkhand vidhansabha election result
झारखंड निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :   देशात जो बदल घडत आहे, त्या बदलशी झारखंडच्या जनतेने हात मिळवणी केली असून मी देशाला नव्या दिशेने नेण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल झारखंडच्या जनतेचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी झारखंडमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवानंतर दिली आहे. 

शरद पवार आपल्या मुंबईतील निवास स्थान सिल्वर ओक या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपला आता उतरती कळा लागली आहे. देशातील केवळ पाच राज्यात भाजपची सत्ता राहिली आहे. गरज पडल्यास आगामी काळात भारताची जनता ही झारखंड सारखा विचार करून सत्ता बदल करेल असा विश्वास मला वाटत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

झारखंडमध्ये भाजप विरहीत पक्षांना बहुमत मिळाले आहे. याचा मला आनंद वाटतो आहे.  देशातील  आर्थिक राज्य पैकी एक असलेल्या झारखंडवर पुन्हा सत्ता गाजविण्याचा भाजपचा मनोदय होता. पण त्यांचा हा हेतू झारखंडच्या जनतेने हाणून पाडला आहे, असेही पवार म्हणाले. 

झारखंड हा आदिवासी बहुल भाग आहे. या ठिकाणी सामान्यांचे आणि गरिबांचे मोठे प्रश्न होते. हे प्रश्न सोडविण्यास भाजप सरकार कमी पडले आहे, त्यामुळे त्यांना जनतेने नाकारल्याचे पवार यांनी सांगितले. 

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झारखंडमध्ये खाते खोलताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हुसैनाबाद मतदार संघातील कमलेश कुमार सिंह हे सध्या सुमारे १०००० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांनी ही जागा जिंकली तर राष्ट्रवादी काँग्रेस झारखंडमध्ये आपले खाते खोलणार असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु हे अजूनही स्पष्ट झाले नाही. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी