शरद पवारांनी केलं मोदींचं कौतुक; पंतप्रधान मोदींसारखी शैली माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांकडे नव्हती

Sharad Pawar praises Modi : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas aghadi government) सरकार आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government) अनेक गोष्टींवरुन मतभेद होत असतात. राज्यातील सरकारमधील शिवसेनेतील (Shiv Sena) नेते एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Sharad Pawar
शरद पवारांच्या मनात चाललंय काय; केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशासनावर पकड मजबूत आहे.
  • मोदी कोणतं काम करतात ते त्याला पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत. - शरद पवार
  • पंतप्रधान मोदी सरकारच्या धोरणांना प्रभावीपणे राबवण्यासाठी आग्रही असतात.

Sharad Pawar praises Modi : नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas aghadi government) सरकार आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government) अनेक गोष्टींवरुन मतभेद होत असतात. राज्यातील सरकारमधील शिवसेनेतील (Shiv Sena) नेते एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्याची संधी सोडत नाही. आज परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष (President)  शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. 

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशासनावर पकड मजबूत आहे, हाच त्यांचा सर्वात भारी गुण आहे. मोदींचं कौतुक करताना शरद पवार यांनी अजून इतर मुद्द्दयावर आपलं मत मांडले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्य शैलीविषयी बोलताना पवार म्हणाले जेव्हा ते कोणतं काम करतात ते त्याला पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत. मोदी हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ घेत असतात. हाती घेतलेलं कार्य पूर्ण होईपर्यंत मोदींना चैन पडत नसल्याचं पवार म्हणाले. 

ते सरकारच्या धोरणांना प्रभावीपणे राबवण्यासाठी आग्रही असतात. याशिवाय प्रशासन आणि सहकारी त्या धोरणांचं कसं अवलंब करतील, यासाठी त्यांना एकत्र आणत असतात. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची, जी कसब पंतप्रधान मोदींकडे आहे, तशी शैली माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे नव्हती. पुढे बोलताना, शरद पवार म्हणाले की, माझी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आमचं मत होतं की, तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या विरोधात सूडबुद्धीचे राजकारण करू नये. तेव्हा माझ्याशिवाय नरेंद्र मोदींशी चर्चा करेल, असा मंत्री त्यावेळी सरकारमध्ये नव्हता. कारण त्याकाळी मोदी हे मनमोहन सिंग यांच्यावर वारंवार हल्लाबोल करत असतं. 

पवार म्हणाले की, जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी केंद्रात होतो. जेव्हा पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवत असायचे, तेव्हा मोदी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व करत आणि केंद्रावर जोरदार हल्ला करायचे. मोदींचा हल्लाबोल पाहून केंद्रातील मंत्री मोदींना कसं प्रतित्त्युर द्यायचं यावर योजना आखत असायचे. राज्यसभा खासदार युपीएच्या अंतर्गत बैठकीत उपस्थितीत सर्व मंत्र्यांना सांगत की, त्यांच्याकडे मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपमध्ये मदभेद असतील. पण कोणीही हे विसरू नये की ते मुख्य्मंत्री आहेत.  

शरद पवार म्हणाले की, मी बैठकीत म्हणत असायचो की, ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि नागरिकांनी त्यांना जनादेश दिला आहे. जर ते काही प्रश्न घेऊन किंवा काही मुद्द्यांसोबत येत असतील तर त्यांचे समाधान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतभेदाचे समाधान केलं जावं. माझ्या या मताशी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सहमत असायचे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी असा एकमेव केंद्रीय मंत्री होतो की, जो गुजरात राज्यात जातं आणि तेथील मुद्द्यांना पाहत असायचो. मी आणि मनमोहन सिंग आमचं मत होतं की, आापण तत्कालीन मुख्यमंत्र्यांविरोधात सूडबुद्धीचे राजकारण करु नये. आमचं मत होते की, ''आपण प्रशासनाच्या बाहेर जाऊ नये आणि आम्ही तसं कधी केलं नाही'' दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले की, युपीए आघाडीमधील काही नेत्यांनी गुजरात सरकारमधील काही नेत्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी