Sharad Pawar : शरद पवारांच्या हाती युपीएची कमान? दिल्लीत झाला प्रस्ताव पास, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनुमोदन

नुकतंच पाच राज्यातील विधासभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. कपिल सिब्बल सारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसची जबाबदारी गांधी परिवार सोडून इतर नेत्याकडे द्यावी अशी मागणी केली आहे. आता शरद पवार युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी होत आहे.

sharad pawar
शरद पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुकतंच पाच राज्यातील विधासभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे.
  • काँग्रेसची जबाबदारी गांधी परिवार सोडून इतर नेत्याकडे द्यावी अशी मागणी होत आहे.
  • आता शरद पवार युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी होत आहे.

Sharad Pawar : नवी दिल्ली : नुकतंच पाच राज्यातील विधासभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. कपिल सिब्बल सारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसची जबाबदारी गांधी परिवार सोडून इतर नेत्याकडे द्यावी अशी मागणी केली आहे. आता शरद पवार युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी होत आहे. दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक पार पाडली. त्यात शरद  पवार यांना युपीएचे अध्यक्ष बनवावे असा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी मागणी केली होती. परंतु आता पक्षाच्या एका संघटनेने तसा प्रस्ताव पारित केला आहे. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा म्हणाले की सध्याची परिस्थिती पाहता देशाला शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्त्वाची गरज आहे. शरद पवार देशात पुन्हा बंधुभाव प्रस्थापित करू शकतात. देशात प्रत्येक नेते आणि पक्षाशी शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहे, पवार सर्व पक्षांना एकत्र आणू शकतात असे शर्मा म्हणाले. 


२०२४ ला शरद पवार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात का? या प्रश्नावर धीरज शर्मा म्हणाले की, सध्या कुठल्याही पदाचा प्रश्न नाही. परंतु सध्या देशाला शरद पवार यांच्या अनुभवाची गरज आहे. खुप सारे पक्ष काँग्रेस सोबत नाहीत. परंतु पवार यांच्यामुळे हे पक्ष एकत्र येतील असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.  


राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे सध्या युपीएचे नेतृत्व करण्यासाठी योग्य नाही असे मेमन म्हणाले. २०२४ साठी जास्त वेळ उरला नसून काँग्रेसने युपीएची जबाबदारी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेतृत्वाकडे सोपवावी अशी मागणी मेमन यांनी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी