Congress President Election: शशी थरूर यांच्या नावावर G - 23 नेते असहमत, अशोक गेहलोतसोबत आणखी एक नेता अध्यक्षपदाच्या शर्यतीत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांची नाव चर्चेत आहेत. परंतु काँग्रेसमधील G - 23 गटाच्या नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी एकमत नाही, आधी शशी थरूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त होते. आता शशी थरू यांच्या नावाची चर्चा नाही असे सांगितले जात आहे. थरूर यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदासाठी नामांकन भरण्याचा निर्णय घेतला आहे.

shashi tharoor
शशी थरूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांची नाव चर्चेत आहेत.
  • परंतु काँग्रेसमधील G - 23 गटाच्या नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी एकमत नाही
  • थरूर यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदासाठी नामांकन भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Congress President Election: नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress Presendtial) शशी थरूर (Shashi Tharoor) आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot) या दोन नेत्यांची नाव चर्चेत आहेत. परंतु काँग्रेसमधील G-23 गटाच्या (G 23 Leaders) नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी एकमत नाही, आधी शशी थरूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त होते. आता शशी थरू यांच्या नावाची चर्चा नाही असे सांगितले जात आहे. थरूर यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदासाठी नामांकन भरण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी थरूर आणि गेहलोतसोबत काँग्रेसचा आणखी एक नेता काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. (shashi tharoor manish tiwari may run for congress presidential election)

अधिक वाचा :  पुरानंतर पाकिस्तानमध्ये मलेरियाचे संकट, मच्छदाणीसाठी पाकिस्तानने मागितली मदत


मनीष तिवारी चर्चेत

काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष तिवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरू शकतात. तिवारी सध्या यावर सल्ला मसलत करत आहेत. जर योग्य पर्याय नाही मिळाला तर तिवारी अध्यक्षपदासाथी नामांकन भरू शकतात. काल पंजाब काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधींच्या नावाला संमती देण्यात आली.

अधिक वाचा :  Child Pornography: मुलींचे अश्लील व्हिडीओ 20-30 रुपयांत ट्विटरवर विकले जातात, दिल्ली महिला आयोगाचे ट्विटर इंडिया हेडला समन्स

शशी थरूर यांच्याकडून हालचाली

थरूर यांनी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. थरूर यांनी यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. परंतु आपण एका विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले होते. आता थरूर यांनी निवडणुकीसंबंधित सर्व माहिती घेतली आहे. थरूर 24 सप्टेंबरला अध्यक्षपदासाठी फॉर्म भरतील असेही सांगितले जात आहे. 

अधिक वाचा : Accident News: भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, डिव्हायडरवर झोपलेल्या लोकांना ट्रकनं चिरडले


गेहलोत यांची अट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला आहे. जर मुख्यमंत्रिपद सोडावे लागलेच तर आपण म्हणू त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावे अशी अट गेहलोत यांनी ठेवली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 

दिग्विजय सिंह भरणार नामांकन

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सिंह हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी