IAS Success Stories : नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा देशातील अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा म्हणून ओळखली जाते. प्रशासकीय किंवा नागरी सेवांसाठी (Civil Services Exam)ही परीक्षा दिली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले लोक देशाच्या महत्त्वाच्या अधिकारीपदावर पोचतात. त्यामुळे ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात, तर काही विद्यार्थ्यांना अनेक प्रयत्नांनंतर यशाची चव चाखता येते. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात वाढलेल्या नम्रता जैन (Namrata Jain) हीचे देखील स्वप्न होते या नागरी सेवेत सामील होण्याचे. आपल्या जिद्दीने नम्रता जैन मोठे यश मिळवत आयएएस (IAS) झाली आहे. तिला यूपीएससी परीक्षेत (UPSC)मिळालेल्या यशाची ही कहाणी आहे. (She first become IPS, then again prepared for UPSC & become IAS, story of Namrata Jain)
नम्रता जैन या मूळच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अशांत गीदाम भागातील आहेत. तिच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर, ती हायस्कूलसाठी दुर्ग जिल्ह्यात गेली आणि अभियांत्रिकी पदवीसाठी भिलाईला गेली. तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC 2016 मध्ये AIR 99रॅंक मिळवले. त्यानंतर त्या आयपीएस अधिकारी झाल्या. मात्र तिला IAS अधिकारी बनायचे होते. म्हणूनच तिने UPSC परीक्षेसाठी पुन्हा अर्ज केला आणि देशभरातून 12 वी रॅंक या नागरी सेवा परीक्षएत मिळवली.
नम्रताचे काका सुरेश जैन म्हणाले की, 'ती शालेय शिक्षणात आणि कॉलेजमध्येही खूप हुशार मुलगी होती. ती एक दिवस नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होईल हे आम्हाला माहीत होते. त्यांनी हे देखील सांगितले की नम्रताने दुर्ग आणि भिलाई येथे तिच्या गावी गीदामपासून सुमारे 350-400 किलोमीटर अंतरावर अभ्यासासाठी कसा प्रवास केला होता. नम्रताचे काका सुरेश जैन म्हणाले, 'तिने तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिने कधीही अभ्यासात रस गमावला नाही आणि लक्ष केंद्रित केले नाही. हे सर्व तिच्या मेहनतीचे फळ आहे.
अधिक वाचा : UPSC Exam पास झाल्याचा आनंद गगनात मावेना, सत्य बाब समजताच कुटुंबाने मागितली माफी; जाणून काय आहे हा प्रकार
उमेदवार आर्थिकदृष्ट्या भक्कम असेल, तर त्याने नोकरीपेक्षा केवळ तयारीवर भर द्यावा, असे नम्रता यांचे मत आहे. त्यांच्या मते, पूर्णपणे समर्पित राहून या परीक्षेत यश मिळते. मात्र, आर्थिक स्थिती चांगली नसेल तर नोकरीबरोबरच यूपीएससी परीक्षेची तयारी करून यश मिळवता येते, असा विश्वासही तिला वाटतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे युपीएससी 2021चा निकाल (UPSC Result 2021) टॉपर्सच्या यादीसह प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने, UPSC ने आता निवडलेल्या उमेदवारांसाठी UPSC नागरी सेवा 2021 चे गुण प्रसिद्ध केले आहेत. युपीएससी 2021 परिक्षेची टॉपर असलेल्या श्रुती शर्माने एकूण 1150 गुण मिळवले आहेत आणि 54.57% सह अव्वल स्थान पटकावले आहे. खाली UPSC टॉपर्स 2021 चे गुण तपासा. संपूर्ण यादी देखील दिली आहे.