दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जुलै २०१९: शीला दीक्षित यांचं निधन ते धोनीची माघार

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जुलै २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आज दिवसभरातली पहिली बातमी ही दुःखद बातमी आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी राज्यपालांसंदर्भातली आहे. सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तिसरी महत्त्वाची बातमी राज्यातली आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेवर आहेत. आज त्यांची यात्रा नाशिकमध्ये होती. आज त्यांनी नाशिकच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर आजचा वार अपघातवार ठरला आहे. पुणे-सोलापुर मार्गावर भीषण अपघात झाला. यात ९ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाचवी महत्त्वाची बातमी क्रिडा क्षेत्रातली आहे. महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. आपण दोन महिने उपलब्ध नसल्याचं धोनीनं बीसीसीआयला सांगितलं आहे. जाणून घ्या या बातम्या सविस्तर 

  1. शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटाः काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
  2. या सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त, जाणून घ्या तुमच्या राज्याचं कोण आहे राज्यपाल: केंद्र सरकारनं काही राज्यांच्या राज्यपालांमध्ये बदल केले आहेत. काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त केलं आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
  3.  शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणारः आदित्य ठाकरे : आज नाशिकमध्ये शिवसेनेकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी तेथील नागरिकांना संबोधित केलं. तसंच शिवसैनिकांना सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. बातमी वाचण्याासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. पुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू:  पुणे-सोलापूर मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृतक तरुण हे सर्व पुणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. बातमी वाचा सविस्तर.
  5. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम:  टीम इंडिया ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. सगळ्याच क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे धोनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असेल की नाही.याबाबत धोनीनं BCCI ला आपलं मत कळवलं आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० जुलै २०१९: शीला दीक्षित यांचं निधन ते धोनीची माघार Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
भारतीय सैन्याला मोठं यश, अभिनंदनला ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा
भारतीय सैन्याला मोठं यश, अभिनंदनला ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा