शीला दीक्षित अनंतात विलीन

LIVE Former Chief Minister Sheila Dikshit Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sheila Dikshit
शीला दीक्षित अनंतात विलीन  

Former Chief Minister Sheila Dikshit Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं २० जुलै रोजी निधन झालं. शीला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेसचं अध्यक्षपद देखील सांभाळलं होतं. शीला दीक्षित यांच्या जाण्यानं काँग्रेससह सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. राष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधानपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांची निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

शीला दीक्षित यांचं निधन

  1. शीला दीक्षित अनंतात विलीन 
  2. निगम बोध घाट येथे शीला दीक्षित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
  3. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली
  4. शीला दीक्षित यांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी प्रतिक्रिया देत म्हटलं, शीला या माझ्यासाठी एक मोठा आधार होत्या. त्या माझ्यासाठी एक मोठी बहिण आणि मैत्रिणही होत्या. शीला दीक्षित यांचं निधन हे काँग्रेस पक्षासाठी मोठं नुकसान. त्या माझ्या नेहमीच लक्षात राहतील.
  5. शीला दीक्षित यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली
  6. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शीला दीक्षित यांना वाहिली श्रद्धांजली
  7. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली 
  8. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शीला दीक्षित यांना वाहिली श्रद्धांजली 
  9. थोड्याच वेळात निघणार अंत्ययात्रा
  10. शीला दीक्षित यांच्यावर दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार

 

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

केजरीवाल यांनी म्हटलं की, शीला दीक्षित यांना लोकं नेहमीच लक्षात ठेवतील. त्यांनी दिल्लीसाठी खूप काम केलं होतं. भलेही आम्ही वेगवेगळ्या पक्षातले होतो, जेव्हा ही मी त्यांना भेटलो त्यांनी खूप दाखवले. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांनी श्रद्धांजली वाहिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शीला दीक्षित यांच्या निधनावर ट्विट करून दुःख व्यक्त केलं. त्यासोबतच पंतप्रधान मोदींनी शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पित केली. 

 

 

यूपीए चेअरपर्सन सोनिया गांधी यांनी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. 

 

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सुद्धा शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली. 

 

 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली. 

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा शीला दीक्षित यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विट केलं. 

भाजपचे वरिष्ठ नेता विजय गोयल यांनी शीला दीक्षित यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. 

 

 

आज संध्याकाळपासून शीला दीक्षित यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. 

शीला दीक्षित यांचं पार्थिव शरीर निजामुद्दीन स्थित त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. 

रविवारी सकाळी त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात नेण्यात येईल. त्यानंतर दुपारी अडीच वाजता दिल्लीच्या निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

 

 

दिल्ली सरकारनं शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दोन दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

 

 

रविवारी २.३० वाजता निगम बोध घाटावर शीला दीक्षित यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. 

 

 

आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्यांचं पार्थिव निजामउद्दीन येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
शीला दीक्षित अनंतात विलीन Description: LIVE Former Chief Minister Sheila Dikshit Passes Away: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...