छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राहुल गांधींनी केले अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि राहुल गांधी यांनीही ट्वीट करत शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. शिवजयंतीच्या या खास दिनी देशातील या मोठ्या नेत्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या

shiv jayanti 2021 pm modi amit shah and rahul gandhi remembers chhatrapati shivaji maharaj on his 391st birth anniversary
शिवजयंतीनिमित्त मोदी, अमित शहा आणि राहुल गांधींचे अभिवादन 

थोडं पण कामाचं

  • नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे शिवाजी महाराजांना अभिवादन  
  •  ट्वीट करून देशवासियांना दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा
  •  राहुल गांधीनीही ट्वीटरवर दिल्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021, नवी दिल्ली : हिंदवी स्वराज्याचे स्थापक आणि वीर योद्धा म्हणून देशभर ओळखले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ३१९ वी जयंती आज देशभर साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राहुल गांधी यांनीही ट्वीट करत शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. 

शिवजयंतीच्या या खास दिनी देशातील या मोठ्या नेत्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केले आहे की, ‘भारतमातेचे अमर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतवार नमन. त्यांचे अगम्य धाडस, अद्भुत शौर्य आणि असामान्य बुद्धिमत्तेच्या कथा देशवासियांना पिढ्यान्-पिढ्या प्रेरणा देत राहतील.जय शिवाजी!’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लिहिले की, ‘राष्ट्रवादाचे जिवंत प्रतिक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अद्वितीय बुद्धिमत्ता, अद्भुत धाडस आणि उत्कृष्ट प्रशासकिय कौशल्याने सुशासनाची स्थापना केली होती. आपल्या दूरदृष्टीने त्यांनी एका मजबूत नौदलाची उभारणी केली. अनेक लोकोपयोगी योजनांची सुरूवातही केली. अशा राष्ट्रगौरवास कोटी-कोटी अभिवादन.’

याचबरोबर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन केले. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘शौर्य, धाडस आणि पराक्रमाचे  प्रतिक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.


 
शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडे पुण्याजवळची जहागिरी मिळाली होती.  शिवाजी महाराज आई जिजाबाईंसोबत पुण्यात राहायचे. जिजामातांनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना शक्तिशाली योद्धा बनवण्यासाठीचे संस्कार केले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी