लोकसभेच्या उपाध्यक्षपदी सेनेच्या भावना गवळी? 

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 06, 2019 | 22:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

 लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची आज सकाळी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली. त्यानुसार शिवसेनेकडून पाचवेळच्या खासदार भावना गवळी यांचे नाव सूचविण्यात आले आहे. 

bhawana gawali
भावना गवळी 

मुंबई : लोकसभा उपाध्य़क्षपदी शिवसेनेच्या भावना गवळी यांचे नाव सूचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभेत पाच वेळा निवडणूक येण्याची कामगिरी भावना गवळी यांनी केली आहे. तरी मंत्रीपद देताना त्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे भावना गवळी नाराज होत्या. त्यांना आता लोकसभेचे उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. तसेच केंद्रातील भाजपकडे मागणी करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्याचाही हा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. 
 
 यापूर्वी भावना गवळी यांना शिवसेनेचे गटनेतपद सोपवले जाण्याचा विचार करण्यात आला होता. पण त्यांनी हे पद नाकारले होते. आता ही नाराजी कशी दूर करावी असा प्रश्न शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीसमोर होता. त्यामुळे त्यांनी आता हे घटनात्मक पद देण्याचा विचार केला आणि त्यासंदर्भातील मागणी भाजपकडे करण्यात आली आहे.  


 
शिवसेना लोकसभा निवडणुकीत १८ खासदारासह भाजपनंतर दुसरा पश्र ठरला आहे. तरीही भाजपने शिवसेनेला केवळ अवजड उद्योग मंत्रीपद देऊन बोळवण केली होती. त्यानंतर शिवसेनमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर उमटला होता. शिवसेनेचे जाहीरपणे बोलून दाखवले नाही. पण शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता होती.  युती करून नेहमीचे अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. त्यामुळे हे अवजड खात्याचे दुखणे झाले होते. 

शिवसेनेने लोकसभा निवडणकुीत १८ जागा जिंकून एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे अधिक मंत्रिपदं आणि चांगली खाती मिळावी अशी शिवसेनेची मागणी आहे. याबरोबरच आता शिवसेनेने लोकसभेचं उपसभापती पदही मागितलं आहे. एएनआयशी बोलताना शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत असं म्हणाले की, 'लोकसभेचं उपाध्यक्ष पदाची आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक हक्क आहे. शिवसेनेला हे पद मिळायला हवं.' 

अशीही माहिती मिळते आहे की, शिवसेना पक्षप्रमुख केंद्र सरकारमध्ये शिवसेनेल्या मिळालेल्या मंत्रिपदामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात चांगलं मंत्रिपद देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. याशिवाय लोकसभेच्या उपाध्यक्षपदावरही त्यांनी आता दावा सांगितला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी