पंजाबमध्ये पतियाळात हिंसा, शिवसेनेच्या हरिश सिंगलाला अटक

Shiv Sena leader Harish Singla was arrested in connection with the clash that broke out in Patiala : पंजाबमधील पतियाळा (पटियाला) येथे खलिस्तान समर्थक आणि खलिस्तान विरोधक यांच्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर खलिस्तान विरोधात मोर्चा काढणाऱ्या गटाच्या हरिश सिंगलाला अटक करण्यात आली.

Shiv Sena leader Harish Singla was arrested in connection with the clash that broke out in Patiala
पंजाबमध्ये पतियाळात हिंसा, शिवसेनेच्या हरिश सिंगलाला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पंजाबमध्ये पतियाळात हिंसा, शिवसेनेच्या हरिश सिंगलाला अटक
  • हरिश सिंगला हा पंजाबमधील शिवसेना बाळ ठाकरे गटाचा नेता
  • हरिश सिंगलाच्या नेतृत्वात खलिस्तान विरोधकांचा मोर्चा पतियाळातील आर्य समाज चौकातून निघाला होता

Shiv Sena leader Harish Singla was arrested in connection with the clash that broke out in Patiala : पतियाळा : पंजाबमधील पतियाळा (पटियाला) येथे खलिस्तान समर्थक आणि खलिस्तान विरोधक यांच्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर खलिस्तान विरोधात मोर्चा काढणाऱ्या गटाच्या हरिश सिंगलाला अटक करण्यात आली. हरिश सिंगला हा पंजाबमधील शिवसेना बाळ ठाकरे गटाचा नेता आहे. 

हरिश सिंगलाच्या नेतृत्वात खलिस्तान विरोधकांचा मोर्चा पतियाळातील आर्य समाज चौकातून निघाला होता. या मोर्चाला पोलीस परवानगी नव्हती. मोर्चात सहभागी असलेल्यांवर खलिस्तान समर्थकांनी दगडफेक केली. यानंतर खलिस्तान समर्थक आणि विरोधक यांच्यात हाणामारी तसेच दगडफेक झाली. दोन्ही गटांतील काही सदस्यांच्या हातात तलवारी आढळल्या. अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि हवेत गोळीबार केला. पोलीस कारवाई सुरू होताच दोन्ही गटांच्या सदस्यांची पळापळ झाली. कडेकोट बंदोबस्त ठेवून पोलिसांनी हिंसा थांबवली.

पुन्हा दंगल भडकू नये म्हणून प्रशासनाने पतियाळा (पटियाला) येथे संध्याकाळी सात वाजल्यापासून उद्या (शनिवार ३० एप्रिल २०२२) सकाळी ६ वाजेपर्यंत सीआरपीसी १४४ अंतर्गत संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली. संपूर्ण पतियाळात कडेकोट पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीनंतर पोलिसांनी खलिस्तान विरोधात मोर्चा काढणाऱ्या गटाच्या हरिश सिंगलाला अटक केले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी घटनेचा निषेध केला तसेच सर्वांना शांतता राखण्याचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पंजाबमध्ये कोणालाही हिंसा करू देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसची 'आप'वर टीका

पंजाबमध्ये हिंसा झाल्यानंतर काँग्रेसने आम आदमी पार्टीवर टीका करायला सुरुवात केली आहे. केजरीवाल व्यस्त आहेत आणि मान यांनी अद्याप निर्देश मागितलेले नाही. पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाबमधील परिस्थिती वाईट आहे. प्रशासन कशा प्रकारचे असू नये याचे हे आदर्श उदाहरण म्हणता येईल; अशी टीका काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी केली. आम आदमी पार्टी आता पटियालाच्या रस्त्यांवरून शांती मोर्चा काढणार काढणार का, अशा स्वरुपाचा प्रश्न काँग्रेसच्या अलका लांबा यांनी उपस्थित केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी