दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जुलै २०१९: सेनेचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा ते इंग्लंडचा विजय

Headlines of the 11 July 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जुलै २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे शिवसेना संदर्भातली. शिवसेना पिक विम्यासाठी १७ जुलैला मुंबईत मोर्चा काढणार आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली आहे. दुसरी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे. यंदापासून वैद्यकीय प्रवेश घेताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू होणार आहे. उच्च न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतरची तिसरी वाईट बातमी आहे गोरेगावमधील. तीन वर्षांचा चिमुरडा नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. अजूनही त्या चिमुरड्याचा शोध सुरू आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चौथी बातमी सामान्यांना धक्का देणारी आहे. आज सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. सोन्याच्या चांदीचे दर आज पुन्हा वाढले आहेत. पाचवी महत्त्वाची बातमी आहे वर्ल्ड कप संदर्भातली. आज वर्ल्ड कप २०१९ मधला दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगला. यावेळी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. सत्ताधारी शिवसेना पिक विम्यासाठी १७ जुलैला मुंबईत काढणार मोर्चाः  Shivsena विमा कंपन्यांनी पिक विमा योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी, या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. १७ जुलैला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले. मोर्चासंबंधी अधिक माहिती जाणून घ्या. 
  2. यंदापासून वैद्यकीय प्रवेश घेताना लागू होणार मराठा आरक्षणः मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आच उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेश घेताना मराठा आरक्षण लागू होणार आहे. विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. बातमी सविस्तर वाचा. 
  3. गोरेगावमध्ये ३ वर्षाचा चिमुकला पडला गटारात, अजूनही शोध सुरूः गोरेगावच्या आंबेडकनगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. काल या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. यावेळी या परिसरातील ज्या गटारात हा चिमुकला पडला त्या गटाराचे झाकण उघडे होते. अधिक बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. Gold Silver Price अमेरिकेत व्याजदर घटण्याचे संकेत; सोन्याच्या दरात उच्चांकी उसळीः Gold Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम असून, रूपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला ही झळाळी आल्याचे दिसत आहे. चांदीच्या भावात किलोमागे ३०० रूपयांनी तेजी पाहायला मिळाली. सोन्या-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  5.  इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयः आज वर्ल्ड कप २०१९ मधला दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगला. यावेळी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी