काँग्रेसला हा अखेरचा धक्का - उद्धव ठाकरे

लोकल ते ग्लोबल
Updated May 27, 2019 | 09:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्र सामनातून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेने काँग्रेसच्या पराभवाचं कारण सांगत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

काँग्रेस पक्षाचे काय होणार?

मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस पक्ष चालवण्यापेक्षा बरखास्त केलेला बरा. राहुल गांधींनी पराभवानंतर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मात्र, तो स्वीकारला नाही. हा राजीनामा न स्वीकारणाऱ्यांना चेहरे नाहीत आणि मजबूत हात नाहीत हेच काँग्रेसचे खरे स्वरुप आहेत अशा पक्षाचे काय होणार? असा प्रश्नही सामानातून उपस्थित करण्यात आला आहे.

काँग्रेसला हा अखेरचा धक्का 

काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप होतो. मात्र, आता ही घराणेशाहीपण काँग्रेसला वाचवू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रियंका गांधी यांना काँग्रेसने आणले मात्र काही उपयोग झाला नाही. उत्तरप्रदेशात पूर्वी दोन जागा होत्या आता केवळ एकच जागा राहीली. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाही अमेठीत पराभव झाला. उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १९४ जागा आहेत मात्र या ठिकाणी काँग्रेस अवघ्या तीन जागा जिंकली. १३४ वर्षे जुन्या काँग्रेसला हा अखेरचा धक्का आहे. 

नेते आहेत पण कार्यकर्ते नाहीत

पी. चिदंबरम, कमलनाथ, अशोल गेहलोत हे नेते आपली मुलं निवडून आणण्यात गुंतले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव झाला. कार्ती चिदंबरम आर्थिक घोटाळ्यात अडकले असतानाही त्यांच्यासाठी चिदंबरम यांनी उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट केला. हरियाणात भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्या मुलाचा परभव झाला. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. म्हणजेच काँग्रेस पक्षाकडे नेते आहेत पण कार्यकर्त्यांचा दुष्काळ आहे असंही सामानात म्हटलं आहे.

'हा' दोष राहुल गांधींचा नाही तर...

निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना जितकी मते मिळाली त्यापेक्षा कमी मतं काँग्रेसच्या उमेदवारांना मिळत आहेत. राहुल गांधींकडे एकतर पोरखेळ आहे किंवा पेन्शनरांचा क्लब आहे. दिल्लीतील काँग्रेस उमेदवारांना चांगली मते मिळाली पण जिंकून येण्याचं त्यांचे दिवस संपले. हा दोष राहुल गांधींचा नाही तर थकलेल्या दिशाहीन काँग्रेसचा असल्याचं सामानात म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
काँग्रेसला हा अखेरचा धक्का - उद्धव ठाकरे Description: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्र सामनातून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
Loading...
Loading...
Loading...