मोठी बातमी ! शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, सेना खासदाराचा गौप्यस्फोट

Shiv Sena's 12 MP joined Eknath Shinde Camp: शिवसेनेच्या आमदारांसोबतच आता खासदारांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. 

Shiv Sena never left nda till now said Shiv Sena mp rahul Shewale drops bombshell in delhi press conference
मोठी बातमी ! शिवसेना एनडीएतून कधी बाहेर पडलीच नाही, सेना खासदाराचा गौप्यस्फोट 
थोडं पण कामाचं
  • 'युतीच्या चर्चा झाल्या, पण पुढं पावलं उचलली नाहीत'
  • उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा - राहुल शेवाळे
  • आम्ही आजही एनडीएमध्येच आहोत, संजय राऊतांनी युतीमध्ये खोडा घातला - राहुल शेवाळे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेच्या तब्बल १२ खासदारांनी आपला पाठिंबा (Shiv Sena 12 MP join Eknath Shinde camp) जाहीर केला आहे. इतकंच नाही तर या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्रही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत शिवसेनेच्या १२ खासदारांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांचा लोकसभेचे गटनेते म्हणून उल्लेख केला. यानंतर पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं, आम्ही एनडीएसोबतच आहोत आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवारालाच असणार आहे. आम्ही सर्व खासदारांनी आमचे गटनेते विनायक राऊत यांच्याबाबतची नाराजी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. गेली दोन-अडिच वर्ष खासदारांना न्याय मिळवण्याच्या संदर्भात विनायक राऊत अपयशी ठरले त्यांच्या कामाबद्दल नाराजी होती आणि त्यामुळे गटनेता बदलावा ही आमची विनंती होती. पण ही विनंती मान्य केली नाही म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. घटनात्मक आम्हाला अधिकार आहे आणि त्यानुसार, सर्वांच्या संमतीने गटनेता म्हणून माझी निवड झाली आहे. पक्षाच्या प्रतोद भावना गवळी याच आहेत.

हे पण वाचा : संजय राऊत भगवान है : उदयनराजे भोसले यांची टीका

खासदार राहुल शेवाळे यांनी पुढे म्हटलं, एनडीएच्या बाबतीत सांगू इच्छितो की, अरविंद सावंत यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी तो राजीनामा केंद्रीय मंत्रिपदाचा दिला होता, त्यावेळी एनडीएतून बाहेर पडतो असं कुठलंही पत्र शिवसेनेच्या माध्यमातून एडीएला दिलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे अजूनपर्यंत एनडीए जॉईन झाल्याचं लेटर आहे मात्र, एनडीएतून बाहेर पडल्याचं पत्र शिवसेनेने कधीच दिलेलं नाहीये. तसेच यूपीए जॉईन केल्याचंही लेटर शिवसेनेने अद्याप देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही आजही एनडीएतच आहोत.

मोदी-ठाकरेंमध्ये एक तास चर्चा

खासदार राहुल शेवाळे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना-भाजपच्या युती संदर्भात राहुल शेवाळे यांनी म्हटलं, आमच्या चार ते पाच बैठका उद्धव ठाकरेंसोबत झाल्या. २०२४च्या निवडणुकीत सर्व खासदारांना निवडून यायचं असेल तर युती करणं महत्त्वाचं आहे. युतीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलो आहोत त्यासाठी आम्ही आग्रह केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मविआसोबत निवडणुका लढवण्याचं म्हटलं पण आम्ही त्याला विरोध केला. त्यानंतर आम्ही प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात ज्या अडचणी आहेत त्याची माहिती अरविंद सावंत यांना दिली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी ही माहिती उद्धव ठाकरे साहेबांकडे दिली. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासमोर भूमिका मांडली की, एनडीएत जायचं असेल तर राष्ट्रपती पदाच्या आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा हे महत्त्वाचं पाऊल ठरेल.

उद्धव ठाकरे साहेबांनीही सांगितलं की, मलाही युती करायची आहे. मी युती करण्याचा खूप प्रयत्न केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक तास चर्चा झाली. ही बैठक साधारणत: जून महिन्यात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात विधानसभेच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांना वाटलं की, एकीकडे युतीचं बोलणं सुरू असताना आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. ज्या पद्धतीने युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळायला हवा होता तसा शिवसेनेकडून न मिळाल्याने भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, मी युतीसाठी माझ्या परिने प्रयत्न केले आता तुम्ही तुमच्या परिने प्रयत्न करा असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी