Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....; केली मोठी घोषणा

Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray resignation from Maharashtra CM post: उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Shiv Sena Rebel MLA Eknath Shinde first reaction on uddhav Thackeray resignation of chief minister post
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....; केली मोठी घोषणा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांची घेणार भेट
  • शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड झाली - एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

गोवा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार (Thackeray Government) अल्पमतात आलं. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्यास सांगितले. मात्र, बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ठाकरे सरकार कोसळलं. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Eknath Shinde first reaction on Uddhav Thackeray's resignation from Maharashtra CM post)

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, बैठकीत शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड आमदारांनी केली आहे. तसेच पुढील प्रक्रिया आहे सरकार स्थापनेच्या संदर्भात सर्वच्या सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. आता पुढील रणनीती ती मुंबईत गेल्यावर ठरवणार. आता मी मुंबईला चाललो असून पुन्हा गोव्यात येईल.

ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याचं आम्हालाही दु:ख आहे. जी परिस्थिती उद्भवली होती... आमच्या सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती, आमच्या मतदारसंघातील प्रश्न होते, अडचणी होत्या त्यांना जे काही वाईट अनुभव येत होते त्यातून आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊया अशी मागणी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे होती. जर वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कुणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरे साहेबांबाबत आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आदर आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा : एकट्या एकनाथ शिंदेंच्या खात्याला १२ हजार कोटी : जयंत पाटील

सरकार कधी स्थापन होणार?

मी मुंबईत चाललो आहे. त्यानंतर बैठक होईल. मी मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपालांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यावर पुढील रणनीती आणि सत्ता स्थापनेबाबत तुम्हाला माहिती देऊ असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दुपारी राज्यपालांच्या भेट

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यावर देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेचा दावा करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी