Bow and Arrow election Symbol: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठं राजकीय वादळ आलं. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव तात्पुरत्यारित्या गोठवण्यात आलं आणि नंतर शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) 'ढाल तलवार' तर ठाकरे गटाला (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं होतं. त्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण या चिन्हाच्या संदर्भात पुन्हा सुनावणी झाली. दोन्ही गटाकडून झालेल्या युक्तीवादानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या संदर्भात आता पुढील सुनावणी शुक्रवारी (20 जानेवारी 2022) होईल.
या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना म्हटलं, शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी आहेत. शिवसेनेत असलेली फूट म्हणजे एक कल्पना आहे. शिवसेनेत दाखवण्यात आलेल्या या फुटीला काहीही अस्तित्व नाहीये. काही आमदार बाहेर पडले याचा अर्थ पक्ष फुटला असा होत नाही.
हे पण वाचा : पैसे वाचवण्याच्या 8 टिप्स दाखवतील तुम्हाला श्रीमंतीचा मार्ग
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी म्हटलं, लोकशाहीत संख्याबळाला फार महत्त्व असतं. यानुसार, निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शिंदे गटाच्या कागदपत्रांत कोणत्याही त्रुटी नाहीयेत.
ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला की, आम्ही 23 लाख कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांची छाननी निवडणूक आयोगाने करावी. शपथपत्रातील कोणताही कागदपत्र घ्या आणि त्या व्यक्तीला बोलवा. तसेच शिंदे गटाच्या कगदपत्रांच्या सत्यतेसाठी ओळखपरेड करा. अंतिम निकालासाठी घाई करण्यासाठी कोणतीही आणीबाणी नाहीये. शिंदे गटाचे आमदार हे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून आले आहेत. पक्षात असताना घटनेवर आक्षेप का घेतला नाही? पक्षाच्या धोरणांना मानून मतदार हे मतदान करत असतात.
हे पण वाचा : हिवाळ्यात गॅसचा त्रास जास्त का होतो?
सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये. युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याबाबतही स्पष्टता यायला हवी. सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवलं तर कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल. प्राथिमिक युक्तिवाद फेटाळला तर तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल.
हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे
आज कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही. आमदार आणि खासदार यांच्या संख्येनुसार, एकनाथ शिंदे गट हा बहुसंख्येत आहे.
संख्येची बहुसंख्येकडे नेणारी ही आकडेवारी महत्त्वाची आहे. राजकीय पक्ष म्हणून कायद्यात जे निकष आहेत त्या सगळ्या निकषांवर एकनाथ शिंदे गट सरस असल्याचा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकीलांनी केला.
हे पण वाचा : प्रपोज करताना करु नका या चुका
जुनी घटना बाळासाहेब केंद्रीत, नंतर स्वत:साठी पक्षप्रमुख असं पद तयार करण्यात आलं. बाळासाहेबांच्या निधनानंतर तयार केलेलं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले असा दावाही शिंदे गटाच्या वकीलांनी केला होता.