Dadra-Nagar Haveli bypolls: भाजपची दादरा नगर हवेली गेली, लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

Dadra-Nagar Haveli bypolls : दादरा नगर हवेली (Dadra nagar Haveli) लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा (Lok Sabha by-election) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे.

Shiv Sena's historic victory in Lok Sabha by-election
लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • या निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.
  • या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली.
  • मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती.

Dadra-Nagar Haveli bypolls : नवी दिल्ली : दादरा नगर हवेली (Dadra nagar Haveli) लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा (Lok Sabha by-election) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Candidate Kalaben Delkar) यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली. या निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे. तसेच शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचं दिसत आहे.

शिवसेनेच्या या विजयावर संजय राऊत यांनी एक सुचक ट्विट केले आहे. नगर हवेलीच्या मार्गे आपण दिल्ली गाठणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता.

लोकसभेच्या दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्यप्रदेशातील खांडवा या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज या सर्व ठिकाणची मतमोजणी होत आहे. यासोबतच आसाममधील पाच, पश्चिम बंगालमधील चार, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी