Sanjay Raut : शिवसेनेतेले पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय, शिवसेना नेते संजय राऊत यांची माहिती

शिवसेनेची उत्तर भारतीयांबात भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेतले अनेक पदाधिकारी उत्तर भारतीय आहेत अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला सर्वाधिक विरोध कोणी केला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

थोडं पण कामाचं
  • शिवसेनेची उत्तर भारतीयांबात भूमिका स्पष्ट आहे
  • शिवसेनेतले अनेक पदाधिकारी उत्तर भारतीय आहेत
  • राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला सर्वाधिक विरोध कोणी केला ?

Sanjay Raut : अयोध्या : शिवसेनेची उत्तर भारतीयांबात भूमिका स्पष्ट आहे, शिवसेनेतले अनेक पदाधिकारी उत्तर भारतीय आहेत अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला सर्वाधिक विरोध कोणी केला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे अयोध्या दौर्‍यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौर्‍यावर जाणार होते. त्यांच्या या दौर्‍याला सर्वाधिक विरोध कोणी केला असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. अयोध्येत कोणीही जाऊ शकतं. संपूर्ण जगात इथे कोणीही येऊ शकतं आणि भेट देऊ शकतं. आम्हाला प्रश्न विचारला जातो की उत्तर भारतीयांबद्दल आमची भूमिका काय आहे. सध्या माझ्यासोबत मीरा भाईंदरचे आमचे नगरसेवक उपस्थित आहेत ते मूळचे उत्तर प्रदेशचे जौनपूरचे आहेत असेही राऊत म्हणाले. मुंबई, ठाणे या भागात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे उत्तर भारतीय आहेत असे राऊत यांनी सांगितले. तसेच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आमदार नाराज आहेत ही अफवा आहे. उत्तर प्रदेशमध्ये असे कोणी म्हणत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत त्यांचे आकलन कमी आहे. महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे आहेत आणि चारही उमेदवार जिंकून निवडून येतील असे राऊत म्हणाले तसेच बृजभूषण सिंह हे कुणाच्या दबावाखाली आलेले नाहीत. बृजभूषण सिंह यांच्यासोबत आमचे कुठलेही डील झालेले नाही हा प्रश्न चुकीचा आहे असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार काम केले. अनेक अपक्ष आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे केली आहेत. कुठलेही अपक्ष आमदार आमच्यांवर नाराज नाहीत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभा निवडणुकीत जिंकतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी