Smriti Irani Daughter : स्मृती इराणींच्या मुलीचं ठाकरे गटाच्या शिवसेना खासदाराकडून समर्थन, अवैध बार प्रकरणी केला भावनिक दावा

राजकीय वादासाठी अठरा वर्षांच्या मुलीला व्हिलन बनवणे योग्य नाही, असं म्हणत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणींच्या मुलीचं समर्थन केलं आहे.

Smriti Irani Daughter
स्मृती इराणींच्या मुलीचं शिवसेना खासदाराकडून समर्थन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्मृती इराणींच्या मुलीची शिवसेना खासदाराकडून पाठराखण
  • प्रियंका चतुर्वेदींनी केलं समर्थनार्थ ट्विट
  • 18 वर्षांच्या मुलीला व्हिलन न बनवण्याचं आवाहन

Smriti Irani Daughter : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीच्या (Daughter) गोव्यातील अवैध रेस्टॉरंट (Goa illegal bar) प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आता शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) यांनी उडी घेतली असून स्मृती इराणींची मुलगी जोईश इराणी (Zoish Irani) यांची पाठराखण केली आहे. एकीकडे काँग्रेसकडून या प्रकऱणावरून स्मृती इराणी यांचा राजीनामा मागितला जात असताना शिवसेना खासदार चतुर्वेदी यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या उद्धव ठाकरे गटाच्या खासदार असूनही त्यांनी केलेल्या या समर्थनामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

काय म्हणाल्या चतुर्वेदी?

वयाच्या 18 व्या वर्षी लायसन्स घेण्याची नेमकी प्रक्रिया किती जणांना माहित असते? जर एखादी तरुणी आपलं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी कष्ट घेत असेल आणि मेहनतीने आपला व्यवसाय उभा करत असेल, तर राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन तिला टार्गेट करणं योग्य नाही. एका 18 वर्षांच्या तरुणीला खलनायक बनवणं योग्य नाही, असं मत चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं आहे. स्मृती इराणींच्या मुलीच्या नावाचा उल्लेख करता त्यांनी ट्विट केलं आहे. त्या म्हणतात, “ 18 वर्षांच्या मुलांना हे माहितच नसतं की भारतात रेस्टॉरंट चालवण्यासाठी लायसन्स घेण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. राजकारण बाजूला ठेऊन एका 19 वर्षांच्या मुलाची आई म्हणून मी या प्रश्नाकडे पाहते.”

सामान्य नागरिकाकडून ही चूक झाली असती किंवा सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने अशी चूक केली असती, तरीही तुम्ही हेच म्हणाला असता का, असा सवाल एका युजरने केला. त्यालाही चतुर्वेदी यांनी उत्तर दिलं आहे. “माझा भाऊ हा कुठल्याही बड्या कुटुंबातून आलेला नव्हता. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने एक स्वप्न पाहिलं. मुंबईत आपलं स्वप्न साकार करण्याच्या नादात त्याचं मोठं नुकसानही झालं. त्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला. मला नेमकी कशाची काळजी वाटते, हे तुम्ही समजू शकता”, असं उत्तर प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलं आहे. 

अधिक वाचा - Aadhaar - Voter ID card Link: आधार वोटर आयडी लिंक याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता विरोध

काँग्रेसचा हल्लाबोल

गोव्यामध्ये बार चालवण्यासाठी स्मृती इराणींच्या मुलीनं बनावट लायसन्स घेतल्याच्या आरोपावरून काँग्रेसनं रान पेटवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ही माहिती सूत्रांकडून मिळालेली नसून माहिती अधिकारातून अधिकृतरित्या समोर आलेल्या माहितीच्या आधारे हा दावा आपण करत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Breaking News 25 July 2022 Latest Update : Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू झाल्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती , CJI यांनी दिली शपथ, म्हणाले- महिला आणि तरुणांचे हित सर्वोपरी असेल

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात एक रेस्टॉरंट आणि बार चालवत असून तिथे मद्यविक्री केली जाते. या मद्यविक्रीसाठी लागणारा अधिकृत परवाना न घेताच तिने हा व्यवसाय सुरु केल्याचा आरोप केला जात आहे. या बारकडे असणारा परवाना हा बनावट असल्याचं समोर आलं असून त्यावरून सध्या राजकीय वातावरण गरम झालं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी