sanjay raut viral photo with sharad pawar शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जातानाच संजय राऊतांचा फोटो व्हायरल, मीडियाशी बोलताना राऊतांची जीभ घसरली

शरद पवार यांच्यासाठी मुद्दाम खुर्ची उचलून आणली म्हणून संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. उत्तर देताना राऊत यांची जिभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला.

shivsena sanjay raut viral photo with ncp sharad pawar
शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जातानाच संजय राऊतांचा फोटो व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जातानाच संजय राऊतांचा फोटो व्हायरल, मीडियाशी बोलताना राऊतांची जीभ घसरली
  • संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी तत्परता दाखविली
  • शिवसेनेच्या खासदाराने दिल्लीत केलेल्या वर्तनावरुन चर्चेला उधाण

shivsena sanjay raut viral photo with ncp sharad pawar नवी दिल्ली: 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' असे मराठीच्या मुद्यावर राजकारण करणारे अनेकदा म्हणतात. पण दिल्लीत वेगळ्याच पद्धतीने वागतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची कृती. त्यांनी दिल्लीत संसदेच्या आवारात निदर्शने सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी तत्परता दाखविली. या तत्परतेवरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे.

एरवी शक्य होईल तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीजवळ बसण्यासाठी शिवसेना नेत्यांमध्ये स्पर्धा असल्याचे जाणकार सांगतात. जेव्हा ठाकरे कुटुंबातील सदस्य नसतील तिथे पक्षाचा आब राखून शिवसेना नेते वावरतात असे चित्र दिल्लीने अनेक वर्षे बघितले. पण दिल्लीत शिवसेनेच्या खासदाराने दुसऱ्या पक्षाच्या खासदाराला बसण्यासाठी मुद्दाम खुर्ची उचलून आणण्याची तत्परता दाखविल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. असे असताना शिवसेनेच्या खासदाराने दिल्लीत केलेल्या वर्तनावरुन चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यासाठी मुद्दाम खुर्ची उचलून घेऊन येत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो दिल्लीत संसदेच्या आवारात काढण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला बारा खासदारांचे निलंबन झाले. या मुद्यावरुन सरकार विरोधात संसदेबाहेर निदर्शनं सुरू होती. ही निदर्शनं सुरू असताना तिथे शरद पवार आले. यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी तत्परता दाखविली. इतर नेत्यांना बसायला मिळाले की नाही याची चिंता राऊत यांनी केली नाही पण शरद पवार यांच्यासाठी मुद्दाम खुर्ची उचलून आणली. या तत्परतेवरुन पत्रकारांनी नंतर संजय राऊत यांच्यावर प्रश्नांचा मारा केला.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत यांची जिभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला. पुढे राऊत म्हणाले की, शरद पवारांच्या पायाला त्रास होत असल्याचे लक्षात आले म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली. वडीलधाऱ्यांना खुर्ची आणून देणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि हे ज्यांना आवडले नाही ते महाराष्ट्राची संस्कृती नाही तर विकृती आहेत.

ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाडून टाकतील; अशा शब्दात राऊत यांनी त्यांच्या वर्तनावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी