गुप्तेश्वर पांडेवर शिवसेनेचा जोरदार हल्ला, महाराष्ट्राविरोधात केले होते 'राजकीय तांडव'

गुप्तेश्वर पांडे आता बिहारचे माजी डीजीपी झाले आहेत. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आणि ती २४ तासांच्या आत मंजूर झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Shivsena leader Sanjay Raut
गुप्तेश्वर पांडेवर शिवसेनेचा जोरदार हल्ला, महाराष्ट्राविरोधात केले होते राजकीय तांडव 

थोडं पण कामाचं

  • बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना ऊत
  • गुप्तेश्वर पांडेंच्या स्वेच्छानिवृत्तीवरून शिवसेनेचा निशाणा, हे राजकीयीकरण असल्याचा केला आरोप
  • गुप्तेश्वर पांडे बुधवारी संध्याकाळी सोशल मीडियाद्वारे येणार लोकांसमोर

नवी दिल्ली: गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच, पण आता यात थोडासा बदल झाला आहे. ते आता डीजीपी (DGP) नसून माजी डीजीपी (Ex-DGP) झाले आहेत. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात त्यांनी सर्वांसमोर खुलेआम आपले म्हणणे मांडले होते. पण आता ते त्या पदावर नाहीत. त्यामुळे आता ते आपली विचारधारा स्वतंत्र ठेवतात की एखाद्या पक्षाच्या नावेवर स्वार होतात हे बघावे लागेल. गुप्तेश्वर पांडे बुधवारी संध्याकाळी ६ वाजता आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून (social media account) लोकांशी संवाद साधणार (interaction with people) आहेत. पण या घडामोडींवर शिवसेना नेते (Shivsena leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.

शिवसेनेने साधला निशाणा

संजय राऊत यांनी म्हटले आहे की २४ तासांच्या आत स्वेच्छानिवृत्तीला मंजूरी मिळणे हे सिव्हिल सर्व्हिसेसचे राजकियकरण होत असल्याचे प्रतीक आहे. त्यांनी म्हटले आहे की सामान्यतः मोठ्या प्रशासकीय जागांवर ज्या व्यक्ती असतात त्या संबंधित सरकारच्या विचारांशी जोडलेले असतात. पण ज्याप्रकारे गुप्तेश्वर पांडेंचे विचार समोर आले आहेत त्यावरून त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले असतील त्याच्या कोणत्याही गोष्टीवर टिप्पणी करणार नाहीत. पण लोकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतील की ते कोणत्या उद्देशाने अशी विधाने करत आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय तपासाची केली होती मागणी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात येत असताना बिहारचे डीजीपी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी टीव्हीवर येऊन जोरदार पद्धतीने आपले म्हणणे मांडले होते. त्यांनी पुन्हा पुन्हा शिवसेनेच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की कुठे ना कुठे काहीतरी गडबड आहे ज्यामुळे महाराष्ट्र सरकारला याचा तपास सीबीआयकडे द्यायचा नाही. यानंतर जेव्हा हा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आणि रिया चक्रवर्तीकडून काही टिप्पणी करण्यात आली तेव्हा गुप्तेश्वर पांडेंनी म्हटले होते की रियाची लायकी नाही की तिने मुख्यमंत्री नितीश कुमारवर काही बोलावे. पण नंतर त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

स्वेच्छानिवृत्तीवर वार आणि पलटवार

बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालेले नाहीत आणि ना कोणता निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्याबाबत बोलता ते तर राजकारणात प्रवेश न करताही चालू ठेवता येते. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की जो पक्ष त्यांना उमेदवारी देईल त्या पक्षावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. आता त्यांनी महाराष्ट्राविरोधात राजकीय तांडव केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईशी संबंधित मुद्द्यांवर ते सरळ सरळ राजकारण करत आहेत आणि ज्याचे बक्षीस त्यांना लवकरच मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी