भारतीय इतिहासाचे विपुल ज्ञानी होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Babasaheb Purandare : आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे हुशार, ज्ञानी आणि भारतीय इतिहासाचे विपुल ज्ञानी होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचा मान मला मिळाला. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते.

Prime Minister Modi pays homage to Shivshahir Babasaheb Purandare
पंतप्रधान मोदींनी शिवशाहीर पुरंदरेंना वाहिली श्रद्धांजली   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत (Cemetery) अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरुन वाहिली श्रद्धांजली
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे हुशार, ज्ञानी आणि भारतीय इतिहासाचे विपुल ज्ञानी -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Babasaheb Purandare : मुंबई : महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर (Maharashtra Bhushan and Shivshahir) बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb purandare) यांचे आज निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar hospital) बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. साडेआठ वाजता पार्थिव पर्वती येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत (Cemetery) अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.  

आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे हुशार, ज्ञानी आणि भारतीय इतिहासाचे विपुल ज्ञानी होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचा मान मला मिळाला. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते.  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी जेव्हा वयाच्या शंभराव्या वर्षी पदार्पण केलं होतं, तेव्हा पुरंदरेंच्या कार्याविषयी पंतप्रधान मोदी जवळपास २५ ते ३० मिनिटे बोलले होते.  आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मोदींनी साष्टांग नमस्कार घातला होता. 

बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला होता. या समितीच्या अध्यक्षा होत्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन. राज ठाकरे, आशा भोसले, सचिन तेंडुलकर अशी दिग्गज मंडळीही ह्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. याच कार्यक्रमात विशेष हजेरी होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची. याच कार्यक्रमात मोदींनी बाबासाहेबांचा शब्दसुमनांनी गौरव केला. एवढेच नाही तर त्यांच्या कार्यावर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पंतप्रधान बोलले. 13 ऑगस्ट रोजी पुण्यात हा कार्यक्रम पार पडला होता.

मोदी नेमकं काय म्हणाले?

कार्यक्रमात आपल्याला आशीर्वाद देणारे बाबासाहेब पुरंदरेजी, बाबासाहेब सत्कार समितीचे अध्यक्ष सुमित्राताईजी, आणि शिवशाहीत आस्था ठेवणारे बाबासाहेबांचे सर्व अनुयायी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मी सुरुवातीस साष्टांग (हात जोडत) नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत जी शिकवण दिलेली आहे, तिचे आचरण करण्याची शक्ती मला ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे (पुन्हा हात जोडत) करतो. मी आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंना आयुष्याच्या शंभराव्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल ह्रदयापासून शुभेच्छा देतो. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद जसा आतापर्यंत आपल्या सर्वांना मिळाले आहे, तसेच पुढेही दिर्घकाळासाठी भेटत राहो अशी मंगलकामना करतो.

मोदी पुढे म्हणाले, हा खरोखरंच चांगला योग आहे की, ज्यावेळेस बाबासाहेब हे शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत, त्याच वेळेस आपला देशही स्वातंत्र्यांच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहे. मला खात्री आहे की, हा माँ भारतीचाच आशीर्वाद असल्याची अनुभूती बाबासाहेबांना येत असावी. एक आणखी योग आहे, जो स्वातंत्र्यांच्या 75 वर्षासाठी आपल्याला प्रेरणा देतो. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिलं, त्यांच्या कार्याचं लिखाण करण्याचं काम सुरु झालेले आहे. बाबासाहेब पुरंदरे असच कार्य कित्येक दशकांपासून करत आहेत. एवढ्याच एका मिशनसाठी त्यांनी स्वत:चं आयुष्य खर्ची घातलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम बाबासाहेबांनी केलं, त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी राहू. त्यांच्या ह्या कार्याप्रती कृतज्ञ होण्याची संधी आपल्याला मिळाली हे भाग्यच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी