Shocking ! एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की सामूहिक आत्महत्या?

Six of a family found dead in house: एकाच परिवारातील सहा जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • कुटुंबातील सहा जणांचे संशयास्पद अवस्थेत आढळले मृतदेह
  • मृतकांमध्ये चार मुलांचाही समावेश
  • घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल

Rajasthan News: राजस्थानमधून एक खळबळजनक आणि धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. एका कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथील गोगुंदा परिसरात ही घटना घडली आहे. घरातून चार मुलांसह त्यांचे आई-वडिलाचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Shocking 6 members of the same family found dead in Udaipur district Rajasthan mass suicide or murder crime news marathi)

एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली. सर्वच्या सर्व मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या सहा जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

हे पण वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोगुंदा पोलिसांना सोमवारी सकाळच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा सर्वांनाच एक धक्का बसला. घरात सहा मृतदेह आढळून आले. घर सील करण्यात आले असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड दाखल झाले आहेत. 

हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

प्रकाश (40 वर्षे),  दुर्गा (35 वर्षे) असे मृतक आई-वडिलांची नावे आहेत. तर त्यांच्या चार मुलांमध्ये गणेश (5 वर्षे), पुष्कर (4 वर्षे), रोशन (2 वर्षे) आणि एक चार महिन्यांचा मुलाचा समावेश आहे. चारपैकी तीन मुलांचे मृतदेह हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तर चार महिन्यांचा मुलगा हा बेडवर आईच्या शेजारी आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हा तीन महिन्यांपूर्वीच गुजरातमधून घर परतला होता. प्रकाश हा गुजरातमध्ये एका घरात नोकर म्हणून काम करत होता. प्रकाश गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो कामावर जात नव्हता तर आपल्या घरी आला होता. पोलिसांना संशय आहे की, आर्थिक संकटामुळे प्रकाशने आपल्या मुलांना गळफास लावून मारलं आणि त्यानंतर पत्नीसोबत मिळून आत्महत्या केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी