Fire: धक्कादायक! श्रीनगरच्या नूरबाग भागात आग लागून २२ घरे जळून खाक

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 31, 2022 | 17:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Fire In Sringar | जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर जिल्ह्यात गुरूवारी लागलेल्या आगीत तब्बल २२ घरे जळून खाक झाली आहेत. आगीची तीव्रता एवढी होती की कोट्यांवधींचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Shocking A fire broke out in Noor bagh area of Srinagar and burnt down 22 houses
श्रीनगरच्या नूरबाग भागात आग लागून २२ घरे जळून खाक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली.
  • गुरूवारी लागलेल्या आगीत तब्बल २२ घरे जळून खाक झाली आहेत.
  • अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Fire In Sringar | श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर जिल्ह्यात गुरूवारी लागलेल्या आगीत तब्बल २२ घरे जळून खाक झाली आहेत. आगीची तीव्रता एवढी होती की कोट्यांवधींचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

नूरबाग परिसरात मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे ३३ कुटुंबाचे जीवन उध्वस्त केले. आगीच्या भडक्याने वेगाने पेट घेत घरांना वेडा घातला ज्यामुळे त्यांचा संपूर्ण नाश झाला. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानासह आणखी ४ जण जखमी झाले आहेत. 

अधिक वाचा : महाराष्ट्र कोरोना निर्बंधांतून मुक्त, मास्क घालणे ऐच्छिक

अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. लक्षणीय बाब म्हणजे जळून खाक झालेल्या एका घरात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, ज्या लोकांची आगीत घरे जळून खाक झाली आहेत त्यांची नावे देखील समोर आली आहेत. बशीर अहमद शेख, गुलाम अहमद शेख, गुलाम रसूल शेख, अब्दुल अजीज शेख, बशीर अहमद शेख, सनाउल्लाह शेख, परवेज अहमद शेख, सबजार अहमद शेख, निसार शेख, अली मोहम्मद शेख, मोहम्मद सुल्तान शेख, गुलाम अहमद शेख, मुश्ताक अहमद शेख, मिश्रा बानो, बिलाल अहमद शेख, शाहिद अहमद, बशीर अहमद शेख आणि गुलाम हसन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी