Spurious liquor cause 9 death in dhandhuka Gujarat: महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिद गावात दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडली. विषारी दारूमुळे या नागरिकांची प्रकृती बिघडली असल्याचं बोललं जात आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे आता मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. (shocking at least 9 people died after drinking Spurious liquor in gujarat)
दारू प्यायल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या रुग्णालयात या नागरिकांना दाखल केलं. काहींना भावनगर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यामुळे मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भावनगर आणि बोटाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांची प्रकृती खूपच चिंताजनक आहे.
अधिक वाचा : भाजप उपाध्यक्षांनी फार्महाऊसवरच थाटला वेश्या व्यवसाय; ५०० कंडोम सापडले, ७३ जण अटकेत
गुजरातचे पोलीस महानिरीक्षक आशिष भाटिया यांनी सांगितले की, या घटनेनंतर आम्ही कारवाईला सुरुवात केली आहे. तीन दारू तस्करांना आम्ही ताब्यात घेतले आहे. जे कथितपणे या अवैध दारू विक्रीमध्ये सहभागी होते. या तिन्ही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
अधिक वाचा : बापरे! दरवर्षी एक लाखांहून अधिक भारतीय घेतायेत परदेशी नागरिकत्व, पाहा काय आहे कारण
तर उपचार सुरू असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने पत्रकारांना सांगितले की, रविवारी रात्री रोजिद गावात दारू प्यायल्यानंतर काही तासांनी तिच्या पतीची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. तर दुसऱ्या एका पीडित हिम्मतभाईने दावा केला आहे की, रविवारी रात्रीच्या सुमारास एका तस्कराकडून खरेदी केलेली दारू आम्ही प्यायली आणि त्यानंतर कमीत कमी १५ जणांची प्रकृती बिघडली.
पीडित नागरिकांनी जी दारू प्यायली होती त्याचे काही सॅम्पल्स पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. या दारूचा FSL रिपोर्ट अद्याप आलेला नाहीये. हा रिपोर्ट आल्यावर दारू विषारी होती की अन्य कारणांमुळे या नागरिकांचा मृत्यू झाला आहे याबाबत स्पष्टता येईल.